Osmanabad : आशियाई चषक स्पर्धेसाठी निवड झालेला राजवर्धन हंगरगेकर कोण? वाचा सविस्तर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशिया चषक स्पर्धेसाठी २० सदस्यीय संघ निवडला आहे. यात उस्मानाबादच्य राजवर्धन हंगरगेकर याचाही समावेश करण्यात आला आहे.
उस्मानाबाद : येत्या २३ डिसेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे होणाऱ्या 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात उस्मानाबादच्या एका खेळाडूचाही समावेश आहे. त्यामुळे उस्मानाबादचा क्रिकेटर सध्या जोरदार चर्चेत आहे. क्रिकेटची भारतात एवढी क्रेझ आहे, आजकाल प्रत्येक लहान मुलाला क्रिकेटर बनायचे असते, मात्र हे स्वप्न सत्यात खूप कमी लोकांचं उतरते, त्यामुळे राजवर्धन हंगरगेकरसाठी ही सुवर्णसंधी आहे.
उस्मानाबादचा राजवर्धन हंगरगेकर संघात
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशिया चषक स्पर्धेसाठी २० सदस्यीय संघ निवडला आहे. यात उस्मानाबादच्य राजवर्धन हंगरगेकर याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आणखी एक मराठमोळा क्रिकेटर पुन्हा चर्चेत आला आहे. या राजवर्धनच्या कारकिर्दीवरही एक नजर टाकू.
राजवर्धन हंगरगेकरची कारकिर्द
त्याचं मूळ गाव तुळजापूर असून सध्या उस्मानाबाद शहर बार्शी नाका वास्तव्य येथे आहे. जन्म 10 नोव्हेंबर 2002 ला झाला असून त्याने 16 जानेवारी 2021 रोजी 2020-21 सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत महाराष्ट्रासाठी ट्वेंटी-20मध्ये पदार्पण केले. त्याने 21 फेब्रुवारी 2021 रोजी 2020-21 विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. त्यामुळे त्याचा चांगलाच बोलबाला होता. त्यानंतर त्याची आता संघात निवड झाल्यानं त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. महाराष्ट्राच्या मातीतून अनेक दिग्गज क्रिकेटर झाले आहेत. त्यात सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर अशा दिग्गज खेळाडुंची छाप आहे. त्यामुळे गावच्या मातीतही क्रिकेटर तयार होत आहेत, आणि देशासाठी चांगली कामगिरी करत आहेत. मागे काही दिवसांपूर्वीच मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाडचेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे.