Asian Games 2023 | पाकिस्तानची लाज निघाली, 9 वर्षानंतर ‘या’ देशाने घेतला बदला
Asian Games 2023 | ब्रॉन्झ मेडलही पाकिस्तानच्या नशिबात आलं नाही. पाकिस्तानी जनतेला सुद्धा हा पराभव पचवणं कठीण जाईल. या विजयासाह टीमने पाकिस्तान बरोबर 9 वर्षापूर्वीचा हिशोब चुकता केला.
बिजींग : एशियन गेम्स 2023 मध्ये पाकिस्तानला मोठ्या लाजिरवाण्या स्थितीचा सामना करावा लागलाय. महिला क्रिकेट टीममुळे पाकिस्तानी फजिती झाली. पाकिस्तान या इवेंटमध्ये एशियन चॅम्पियन होता. यावेळी त्यांची खूप वाईट अवस्था झाली. गोल्ड मेडल सोडा, कास्यपदक जिंकणही कठीण बनलय. क्रिकेटमध्ये पाकिस्तानला रिकाम्या हाताने परताव लागणार आहे. पाकिस्तानी टीम गोल्ड मेडलसाठी दावेदार होती. हांगझूमध्ये झालेलं महिला क्रिकेट टीमचा पराभव पचवण पाकिस्तानी जनतेसाठी कठीण आहे. पाकिस्तानी टीमची सेमीफायनलमध्ये वाईट अवस्था झाली होती. श्रीलंकेने त्यांना हरवलं होतं. त्यापेक्षाही वाईट अवस्था ब्रॉन्झ मेडलच्या सामन्यात झाली.
बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तानचा सामना झाला. बांग्लादेशच्या महिला टीमने पाकिस्तानी महिला क्रिकेट टीमवर 5 विकेट आणि 10 चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासोबत बांग्लादेशच्या महिला टीमने 9 वर्षापूर्वी झालेल्या पराभवाचा बदला घेतला. 9 वर्षापूर्वी काय झालेलं हे सांगूच. पण एशियन गेम्स 2023 मध्ये ब्रॉन्झ मेडलचा सामना दोन्ही टीम्समध्ये कसा झाला? ते जाणून घ्या. पाकिस्तानी महिला टीमने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. सेमीफायनलची चूक ते या सामन्यात करणार नाही अशी अपेक्षा होती. पण त्यांनी आपल खराब क्रिकेट सुरुच ठेवलं.
बदलाही पूरा झाला
पाकिस्तानी टीमने 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून फक्त 64 धावा केल्या. बांग्लादेशमोर ब्रॉन्झ मेडलचा सामना जिंकण्यासाठी फक्त 65 धावांच आव्हान होतं. त्यांनी 18.5 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून हे लक्ष्य गाठलं. या विजयासह महिला क्रिकेटमध्ये बांग्लादेशने ब्रॉन्झ मेडल मिळवलं. अशा प्रकारे 9 वर्षापूर्वीचा बांग्लादेशचा बदलाही पूरा झाला.
9 वर्षापूर्वी काय झालेलं?
9 वर्षापूर्वी 2014 इंचियॉन एशियन गेम्समध्ये पाकिस्तानने बांग्लादेशच गोल्ड मेडल जिंकण्याच स्वप्न मोडलं होतं. यावेळी बांग्लादेशने पाकिस्तानला हरवलं. महत्त्वाच म्हणजे पाकिस्तानी महिला टीम रिकाम्या हाताने परतणार आहे. हे सर्वात जास्त त्यांच्या जिव्हारी लागणार आहे.