“ती कायम…”, क्रिकेटपटू केएल राहुलने पत्नी अथियाबाबत केलं मोठं वक्तव्य
आयपीएल रिटेन्शन यादीतून लखनौ सुपर जायंट्सने केएल राहुल याला वगळलं आहे. त्यामुळे मेगा लिलावात त्याच्यासाठी किती बोली लागते हा चर्चेचा विषय आहे. कोणती फ्रेंचायझी संघात घेण्यासाठी इच्छुक आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. असं असताना केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.
क्रिकेटपटू केएल राहुल याचा 5 नोव्हेंबरला वाढदिवस असतो. केएल राहुल आता 32 वर्षांचा झाला आहे. सध्या केएल राहुल या ना त्या कारणाने चर्चेत असतो. कसोटी मालिकेतून त्याला प्लेइंग 11 मधून वगळण्यात आलं. तसेच मागच्या आयपीएल पर्वात लखनौ सुपर जायंट्ससोबत झालेल्या वादामुळे चर्चा सुरु होती. अखेर रिटेन्शन यादी समोर आल्यावर याला पूर्णविराम लागला आहे. केएल राहुलच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा या गोष्टींची चर्चा होत आहे. केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टी यांनी 23 जानेवारी 2023 रोजी लग्नगाठ बांधली. सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील बंगल्यात हा विवाह पार पडला होता. केएल राहुल आणि पत्नी आथिया यांच्यात चांगलं बॉण्डिंग आहे. त्यामुळे केएल राहुल आणि आथिया यांच्या सुखी संसारात काही ना काही घडत असतं. असाच एक मजेदार किस्सा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. झालं असं की केएल राहुल आणि आथिया एका कार्यक्रमात गेले होते. तेव्हा त्यांना काही प्रश्न विचारले गेले. यातील एक प्रश्न त्यांच्यात वाद झाला तर कोण पहिल्यांदा माफी मागतो याबाबत होता.
आथियाने यावर लगेच सांगितलं की, ‘भांडणानंतर मीच पहिल्यांदा सॉरी बोलते.’ यावर केएल राहुलने मजेशीर अंदाजात प्रत्युत्तर दिलं आणि सांगितलं की, जो चुकी करतो तोच माफी मागतो. आथिया कायम चुकीची असते. त्याचं हे विधान ऐकल्यावर आथियाला हसू आवरलं नाही. केएल राहुलने पुढे खुलासा करत सांगितलं की, आथिया खूपच हट्टी स्वभावाची आहे.
केएल राहुल क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियासाठी खेळला आहे. 53 कसोटी, 77 वनडे आणि 72 टी20 सामने खेळला आहे. कसोटीत 2981 धावा केल्या आहेत. यात 8 शतकं आणि 15 अर्धशतकं ठोकली आहेत. वनडेत केएल राहुलने 2851 धावा केल्या असून 7 शतकं आणि 18 अर्धशतकं ठोकली आहेत. टी20 क्रिकेटमध्ये 2265 धावा केल्या असून 2 शतकं आणि 22 अर्धशतकं ठोकली आहे. आयपीएलमध्ये केएल राहुलने 132 सामने खेळला आहे. पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघाचं नेतृत्व केलं आहे. केएल राहुलने 4683 धावा केल्या असून 4 शतकं आणि 37 अर्धशतकं ठोकली आहेत.