AUS vs AFG: अरेरे, अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध थोडक्यात पराभव
AUS vs AFG: हरता-हरता वाचली ऑस्ट्रेलिया, राशिद खानच्या खेळाने सर्वांचच मन जिंकलं.
अडिलेड: ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तामध्ये आज सुपर 12 राऊंडमधील सामना झाला. अफगाणिस्तानच टी 20 वर्ल्ड कपमधील आव्हान आधीच संपुष्टात आलय. पण ऑस्ट्रेलियासाठी आजच्या मॅचमध्ये विजय आवश्यक होता. सेमीफायनलमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियासाठी ही मॅच ‘करो या मरो’ होती. अॅडिलेड ओव्हलच्या मैदानात हा सामना झाला. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान विरुद्ध हा सामना जिंकला. पण हा विजय ऑस्ट्रेलियाच्या लौकीकाला साजेसा नाही.
राशिद खानने मन जिंकलं
दुबळ्या अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाकडून मोठ्या विजयाची अपेक्षा होती. पण ऑस्ट्रेलियाने हा सामना फक्त 4 धावांनी जिंकली. अफगाणिस्तानची टीम या मॅचमध्ये लढून हरली. राशिद खानच्या खेळाने सर्वांचच मन जिंकलं. राशिद खानने या मॅचमध्ये 23 चेंडूत नाबाद 48 धावा फटकावल्या. यात 3 चौकार आणि 4 षटकार होते. अफगाणिस्तानकडून राशिदने सर्वाधिक नाबाद 48, गुलबदीन नईबने 39 इब्राहिम झादरान 26 आणि गुरबाजने 30 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून कोण चांगलं खेळलं?
अफगाणिस्तानला लास्ट ओव्हरमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज होती. राशिद खानने फटकेबाजी करुन या ओव्हरमध्ये 18 धावा तडकावल्या. विजयासाठी फक्त 4 धावा तोकड्या पडल्या. ऑस्ट्रेलियाने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 168 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 32 चेंडूत नाबाद 54 धावांची खेळी केली. मिचेल मार्शने 45 धावा केल्या. डेविड वॉर्नरने 25 धावा केल्या. अफगाणिस्तानच्या टीमने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 164 धावा केल्या.