AUS vs ENG: ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सामना रद्द, पॉइंटस टेबलची स्थिती काय?

AUS vs ENG: पावसाचा ग्रुप 1 मध्ये मोठा परिणाम होऊ शकतो.

AUS vs ENG: ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सामना रद्द, पॉइंटस टेबलची स्थिती काय?
Aus-Eng Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 4:22 PM

मेलबर्न: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला पावसाचा फटका बसतोय. आज मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे दोन मॅच रद्द कराव्या लागल्या. चारही टीम्सना प्रत्येकी एक-एक पॉइंट देण्यात आला. ग्रुप 1 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड हा महत्वपूर्ण सामना पावसामुळे होऊ शकला नाही. एका चेंडूचा खेळही या मॅचमध्ये झाला नाही. इंग्लंडसाठी पाऊस मोठा खलनायक ठरु शकतो.

कशी स्थिती बनू शकते?

पावसामुळेच डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे आयर्लंडने इंग्लंडचा पराभव केला. सुपर 12 राऊंडमध्ये ग्रुप 1 मधून तीन टीम्सचे समान 7 पॉइंटस होऊ शकतात.

ऑस्ट्रेलियन टीम कुठल्या स्थानावर?

शुक्रवारी दोन्ही सामन्याचा निकाल लागला नाही. त्यामुळे न्यूझीलंड, इंग्लंड, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे आता प्रत्येकी 3 पॉइंटस आहेत. नेट रनरेटमुळे न्यूझीलंडची टीम टॉपवर आहे. खराब -1.555 रनरेटमुळे गतविजेती ऑस्ट्रेलियन टीम चौथ्या स्थानावर आहे.

श्रीलंकेवर मोठ्या फरकाने विजय मिळवला

न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला पराभूत केलं. नेट रनरेट चांगला राखण्यासाठी त्यांनी श्रीलंकेवर मोठ्या फरकाने विजय मिळवला होता, तरी ऑस्ट्रेलियन टीम चौथ्या स्थानावर आहे.

ग्रुप 1 मध्ये पॉइंटस टेबलची स्थिती काय?

न्यूझीलंड-3, इंग्लंड -3, आयर्लंड-3, ऑस्ट्रेलिया-3, श्रीलंका-2, अफगाणिस्तान-2

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.