AUSvsENG : स्टुअर्ट ब्रॉडचा भरमैदानात गंगनम स्टाईल डान्स, व्हिडीओ पाहिलात का?

ग्लंडच्या टीममध्ये स्टुअर्ट ब्रॉडनं पुनरागमन केलं आहे. डेव्हिड वॉर्नरची विकेट घेतली. मैदानावर स्टुअर्ट ब्रॉडनं गंगनम स्टाईलमध्ये डान्स केला. स्टुअर्ट ब्रॉडचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

AUSvsENG : स्टुअर्ट ब्रॉडचा भरमैदानात गंगनम स्टाईल डान्स, व्हिडीओ पाहिलात का?
स्टुअर्ट ब्रॉड
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 1:07 PM

Stuart Broad सिडनी: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये अ‌ॅशेस मालिकेतील चौथी कसोटी आजपासून सुरु झाली आहे. अ‌ॅशेस मालिका दोन्ही देशांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. ऑस्ट्रेलियातील सिडनी मध्ये आज कसोटी मॅच सुरु झाली आहे. इंग्लंडच्या टीममध्ये स्टुअर्ट ब्रॉडनं पुनरागमन केलं आहे. डेव्हिड वॉर्नरची विकेट घेतली. मैदानावर स्टुअर्ट ब्रॉडनं गंगनम स्टाईलमध्ये डान्स केला. स्टुअर्ट ब्रॉडचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आजच्या चौथ्या कसोटीमध्ये इंग्लंडनं 35 वर्षीय अनुभवी स्टुअर्ट ब्रॉडला संधी दिली आहे. तिसऱ्या कसोटीमध्ये स्टुअर्ट ब्रॉडला आराम देण्यात आला होता. स्टुअर्ट ब्रॉडनं गोलंदाजी करताना इंग्लंडसाठी पहिली विकेट मिळवली. यामध्ये त्यानं ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला आऊट केलं. वॉर्नर 30 धावा करुन बाद झाला.

पाहा व्हिडीओ

मॅच सुरु असताना स्टुअर्ट ब्रॉड इतर खेळाडूंसोबत चेष्टा मस्करी करताना दिसून आला. स्टुअर्ट ब्रॉडचा गंगनम स्टाईल डान्सचा व्हिडीओ ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळानं ट्विटरवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओत स्टुअर्ट ब्रॉड हा क्रॉली या सहकाऱ्यासह गंगनम डान्स करताना दिसून येत आहे.

ऑस्ट्रेलियाची अडखळत सुरुवात

अॅशेसच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना 46 ओव्हरमध्ये तीन विकेटवर 126 धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर 30, मार्कस हॅरिस 38 आणि मारनस लाब्सचेंज यानं 28 धावा केल्या. सध्या स्टीव स्मिथ आणि उस्मान ख्वाजा मैदानावर ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याला कोरोना संसर्ग झाला आहे. ग्लेम मॅक्सवेल सध्या ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश स्पर्धेत सहभागी झाला होता. मेलबर्न स्टार्स या टीमचा तो कॅप्टन आहे. मॅक्सवेल कोरोनाबाधिती झाल्याच्या बातमीला मेलबर्न स्टार्स या टीमकडून दुजोरा देण्यात आला आहे.

इतर बातम्या:

IND vs SA: रिषभ पंतचा जोहान्सबर्गमध्ये धडाका, अनोखी सेंच्युरी करत धोनी किरमाणी यांच्या क्लबमध्ये प्रवेश

IND vs SA: अजिंक्य-चेतेश्वरला ALL THE BEST, दोघांसाठी आज ‘करो या मरो’

Corona Virus चा रणजी करंडक स्पर्धेला फटका, BCCI ने नाईलाजाने घेतला ‘हा’ निर्णय

AUS vs ENG Stuart Broad dance in Gangnam style in Sydney test against Australia

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.