AUS vs PAK 3rd Test Live Streaming | ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने, सामना केव्हा?
Australia vs Pakistan 3rd Test Live Streaming | ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पहिल्या 2 सामन्यात धुव्वा उडवत मालिका जिंकली. त्यामुळे आता पाकिस्तानसाठी तिसरा आणि अंतिम सामना हा प्रतिष्ठेचा आहे.
सिडनी | क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ 2024 या वर्षातील पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ सज्ज आहेत. ऑस्ट्रेलिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानला व्हाईट वॉश देण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान विजय मिळवून लाज राखण्याच्या प्रयत्नात असणार आहे. हा तिसरा आणि अंतिम सामना कधी आणि कुठे होणार, टीव्हीवर कुठल्या चॅनेलवर होणार हे आपण जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान तिसरा कसोटी सामना केव्हा?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान तिसरा कसोटी सामना बुधवारी 3 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान तिसरा कसोटी सामना कुठे?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे आयोजित करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान तिसऱ्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
ऑस्ट्रेलिया आणि भारतात एकूण 5 तास 30 मिनिटांचा फरक आहे. त्यामुळे या सामन्याला ऑस्ट्रेलियात 2 जानेवारीला रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर भारतीय वेळेनुसार हा सामना 3 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजता सुरु होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान तिसरा कसोटी सामना कुठे पाहता येणार?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान तिसरा कसोटी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान तिसरा कसोटी सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान तिसरा कसोटी सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर फुकटात पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल मार्श, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड, स्कॉट बोलँड आणि कॅमेरॉन ग्रीन.
पाकिस्तान क्रिकेट टीम | शान मसूद (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सॅम अयुब, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, सौद शकील, आगा सलमान, आमेर जमाल, साजिद खान, हसन अली, मीर हमजा, शाहीन आफ्रिदी, सरफराज अहमद, मोहम्मद नवाज, इमाम उल हक, फहीम अश्रफ, अबरार अहमद आणि मोहम्मद वसीम जूनियर.