Women’s World Cup 2022: आई बनल्यानंतर दुसऱ्याच सामन्यात पाक कॅप्टनने बलाढय ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकली हाफ सेंच्युरी
आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत (ICC Women’s World Cup 2022)पाकिस्तानी (Pakistan) संघापेक्षा त्यांच्या कर्णधाराचीच जास्त चर्चा आहे. बिस्माह मारुफ (Bismah Maroof) पाकिस्तानी महिला संघाचे नेतृत्व करत आहे.
ऑकलंड: आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत (ICC Women’s World Cup 2022)पाकिस्तानी (Pakistan) संघापेक्षा त्यांच्या कर्णधाराचीच जास्त चर्चा आहे. बिस्माह मारुफ (Bismah Maroof) पाकिस्तानी महिला संघाचे नेतृत्व करत आहे. बिस्माह मारुफची चर्चा होण्यामागे कारणही तसंच खास आहे. काही महिन्यांपूर्वीच बिस्माहने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर मॅटरनिटी लीव संपवून ती थेट मैदानात उतरली आहे. आई झाल्यानंतर वर्ल्डकप ही बिस्माह मारुफची पहिलीच स्पर्धा आहे. आईची जबाबदारी निभावताना बिस्माहने क्रिकेटच्या मैदानात जोरदार कमबॅक केलं आहे. तिने आज वर्ल्डकपच्या दुसऱ्याच सामन्यात थेट अर्धशतक ठोकलं. महत्त्वाचं म्हणजे ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध तिने हे अर्धशतक झळकावलं आहे. बिस्माहने आज अर्धशतक झळकवल्यानंतर आपल्या आनंदात आपल्या मुलीला फातिमालाही सहभागी करुन घेतलं. तिने फिफ्टी ठोकल्यानंतर ड्रेसिंगरुमकडे पाहून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी तिची मुलगी ड्रेसिंग रुममध्ये होती. तिने हे अर्धशतक मुलीला समर्पित केलं आहे.
संकटात असताना डाव सावरला
संघाचा डाव संकटात असताना बिस्माह मारुफने ही अर्धशतकी खेळी केली. संघाचा टॉप ऑर्डर 50 धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतलं होतं. अशावेळी बिस्माहने आलिया रियाजसोबत मिळून संघाचा डाव सावरला. त्यानंतर एका कर्णधाराकडून अपेक्षा असते, तो खेळ तिने दाखवला.
Just second match into her comeback after childbirth and our captain scores a half-century and she dedicates it to her daughter, Fatima.
Bismah Maroof has hit five fours and added 85 runs Aliya Riaz so far.#AUSvPAK #CWC22 #TeamPakistan #BackOurGirls pic.twitter.com/h7M1VdsUiS
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 8, 2022
मुलीला अर्धशतक केलं समर्पित
बिस्माह मारुफने पाच चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. मुलगी फातिमाच्या जन्मानंतर पुनरागमन करताना तिने हे अर्धशतक झळकावलं. कमबॅकच्या दुसऱ्या सामन्यात तिने ही कमाल केली. त्यामुळे आनंदाच्या या क्षणात तिने आपल्या मुलीलाही सहभागी करुन घेतलं.