AUS vs WI 1st Odi | ऑस्ट्रेलियाचा विंडिजवर 8 विकेट्सने विजय, स्टीव्हन स्मिथ-कॅमरुन ग्रीनची नाबाद अर्धशतकं
Australia vs West Indies 1st Odi Highlighst In Marathi | ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकेत दणक्यात सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे.
मेलबर्न | ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील 2 कसोटी सामन्यांची मालिका ही 1-1 ने बरोबरीत राहिली. त्यानंतर 2 फेब्रुवारीपासून उभयसंघात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत विजयाने सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने विंडिजवर 8 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. विंडिकडून विजयासाठी मिळालेलं 232 धावांचं आव्हान हे ऑस्ट्रेलियाने 38.3 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. जोस इंग्लिस, कॅमरुन ग्रीन आणि कॅप्टन स्टीव्हन स्मिथ या तिकडीने ऑस्ट्रेलियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
ऑस्ट्रेलियाची बॅटिंग
ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन स्टीव्हन स्मिथ याने सर्वाधिक नाबाद 79 धावांची खेळी केली. स्टीव्हनने 79 बॉलच्या मदतीने 8 चौकारांसह ही खेळी साकारली. तर कॅमरुन ग्रीन याने 104 बॉलमध्ये 77 धावांची संयमी खेळी केली. कॅमरुन आणि स्टीव्हन या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 149 धावांची भागीदारी केली. त्याआधी जोस इंग्लिस आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 79 धावा जोडल्या. जोस इंग्लिस 65 धावा करुन माघारी परतला. तर ट्रेव्हिस हेड 4 धावांवर बाद झाला. विंडिजकडून गुडाकेश मोती आणि मॅथ्यू फोर्ड या दोघांना 1-1 विकेट मिळाली.
विंडिजची बॅटिंग
त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून विंडिजला बॅटिंगसाठी भाग पाडलं. विंडिजने केसी कार्टी याच्या 88 आणि रोस्टन चेस याच्या 59 धावांच्या जोरावर 48.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 231 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त विंडिजकडून एकालाही 20 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून झेवियर बार्टलेट याने 4 विकेट्स घेतल्या. तर सीन एबोट आणि कॅमरुन ग्रीन या दोघांना 2-2 विकेट्स मिळाल्या. तर एडम झॅम्पाच्या खात्यात 1 विकेट गेली.
ऑस्ट्रेलियाची विजयी सुरुवात
A solid third-wicket partnership between Cameron Green and Steve Smith helps Australia race to a win in the first ODI 👏#AUSvWI: https://t.co/oZ5N7OXZQc pic.twitter.com/CExozgrBF7
— ICC (@ICC) February 2, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्नस लॅबुशेन, मॅथ्यू शॉर्ट, आरोन हार्डी, शॉन ॲबॉट, झेवियर बार्टलेट, लान्स मॉरिस आणि ॲडम झॅम्पा.
वेस्ट इंडिज प्लेईंग ईलेव्हन | जस्टिन ग्रीव्हज, ॲलिक अथनाझे, शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), केसी कार्टी, कावेम हॉज, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, मॅथ्यू फोर्ड, हेडन वॉल्श, गुडाकेश मोटी आणि ओशाने थॉमस.