IND vs AUS : ऑस्ट्रेलियासाठी वाईट बातमी, मोठा खेळाडू ODI सीरीजमधून OUT
IND vs AUS Odi Series : टीम इंडियाने आधीच बॉर्डर-गावस्कर सीरीज 2-1 ने जिंकलीय. आता 17 मार्चपासून वनडे सीरीज सुरु होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियन टीमला धक्का बसलाय.
IND vs AUS : टीम इंडिया विरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला आता वनडे सीरीजआधी मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियासाठी वाईट बातमी आहे. ऑस्ट्रेलियाचा नियमित कॅप्टन पॅट कमिन्स आता वनडे सीरीजमध्ये सुद्धा खेळणार नाहीय. दिल्लीमधील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर पॅट कमिन्स मायदेशी परतला होता. पॅट कमिन्स वनडे सीरीजसाठी भारतात परतणार नाहीय, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून देण्यात आलीय. आईची प्रकृती गंभीर असल्याने पॅट कमिन्स मायदेशी परतला होता. काही दिवसांपूर्वी पॅट कमिन्सच्या आईच निधन झालं.
पॅट कमिन्सच्या आईची कर्करोगाशी झुंज सुरु होती. मागच्याच आठवड्यात कमिन्सच्या आईच निधन झालं. कमिन्स त्याच्या व्यक्तीगत कारणांमुळे क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे.
कमिन्सच्या जागी कॅप्टन कोण?
पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथ वनडे सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाच नेतृत्व करताना दिसेल. स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने इंदोर टेस्ट मॅच जिंकली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच WTC फायनलच तिकीट पक्कं झालं. स्मिथसमोर आता वनडे सीरीज जिंकवून देण्याच आव्हान आहे.
एरॉन फिंचच्या निवृत्तीनंतर पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाच्या वनडे टीमच नेतृत्व संभाळल होतं. त्याने आतापर्यंत 2 मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच नेतृत्व केलय.
Pat Cummins won’t return to India for the ODI leg of the tour #INDvAUS
— cricket.com.au (@cricketcomau) March 14, 2023
भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान 3 वनडे सीरीज
भारत-ऑस्ट्रेलियामध्ये तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळली जाणार आहे. वनडे सीरीजचा पहिला सामना 17 मार्चला मुंबईत आहे. त्यानंतर 19 मार्चला दुसरी वनडे आणि 22 मार्चला वनडे सीरीजचा तिसरा सामना आहे. वनडे सीरीज का महत्त्वाची?
काल बॉर्डर-गावस्कर सीरीज संपली. टीम इंडियाने ही कसोटी मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली. आता वनडे सीरीजच आव्हान आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्ड कप होणार आहे. भारतात ही स्पर्धा होणार आहे. त्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे सीरीज महत्त्वाची आहे.