New Zealand VS Australia T20 World Cup Final Live Streaming | टी20 विश्वचषकाचा थरार, न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियमध्ये अंतिम सामना; कधी, कुठे पाहाल ?
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (New Zealand vs Australia) या दोन दमदार संघात हा सामना रंगणार असून यंदाच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. संपूर्ण विश्वचषकात चौकार- षटकारांचा पाऊस, अप्रतिम गोलंदाजी, थक्क करुन सोडणारे झेल आणि क्षेत्ररक्षणाने डोळ्याचे पारणे फिटले. आता अंतिम सामन्यात काय थरार रंगणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुबई : यंदाचा टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना आज (14 नोव्हेंबर) पार पडणार आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (New Zealand vs Australia) या दोन दमदार संघात हा सामना रंगणार असून यंदाच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. संपूर्ण विश्वचषकात चौकार- षटकारांचा पाऊस, अप्रतिम गोलंदाजी, थक्क करुन सोडणारे झेल आणि क्षेत्ररक्षणाने डोळ्याचे पारणे फिटले. आता अंतिम सामन्यात काय थरार रंगणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सामना कधी सुरु होणार ?
टी-20 विश्वषकाचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामान्याला दुबईमध्ये सायंकाळी ठीक 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. नाणेफेक 7 वाजता होणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर हा समाना रंगेल.
सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे होईल ?
हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 3) हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारित केला जाईल.
लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातूनही पाहता येईल सामना ?
या सामन्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवर ऑनलाईन पाहता येईल.
सामन्यासाठी संभाव्य संघ
संभाव्य न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कर्णधार), डॅरील मिचेल, मार्टीन गप्टील, जेम्स निशम, डेवॉन कॉन्वे, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, इश सोढी, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट, अॅडम मिल्ने.
संभाव्य ऑस्ट्रेलिया संघ: डेव्हिड वॉर्नर, आरॉन फिंच (कर्णधार), मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वॅड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्च, अॅडम झाम्पा, जोश हॅजलवुड.
सामना कोण जिंकणार ?
पहिल्या सेमिफायनल सामन्यात न्यूझीलंड संघाने इंग्लंडवर मात करत अंतिम सामन्यात जागा मिळवली. तर दुसरीकडे पाकिस्तानला नमवत ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला. अंतिम लढतीपर्यंत पोहोचलेल्या या दोन्ही संघांनी सुरुवातीपासून दर्जेदार प्रदर्शन केलेले आहे. फलंदाजी, गोलंदाजी अशा सर्वच ठिकाणी या दोन्ही संघाचे खेळू अव्वल ठरलेले आहेत. आता हेच संघ एकमेंकाविरुद्ध भिडतील. वेगवेगळ्या ग्रुपमधून आलेले हे संघ यंदाच्या विश्वचषकात प्रथमच आमने-सामने येतील.
इतर बातम्या :
विराट कोहलीने ODI आणि Test टीमच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हावं : शाहिद आफ्रिदी
T20 WC सेमीफायनलमध्ये हरलेला पाकिस्तानी संघ दुबईहून रवाना, मात्र मायदेशी परतला नाही!
Breaking : मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना निनावी फोन, मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी