सुट्टीवर गेलेल्या महिला क्रिकेटरला स्ट्रोक, एअरलिफ्ट केलं, इमर्जन्सीमध्ये ब्रेन सर्जरी
15 एप्रिलला ती हवाईच्या एका बेटावर सुट्टया एन्जॉय करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिला स्ट्रोक आला. झटका आल्यानंतर तिला एअरलिफ्ट करुन हवाईची राजधानी होनोलूलू येथे नेण्यात आलं. मागच्या सीजनमध्ये या टीमसाठी ती 14 मॅच खेळली होती.
ऑस्ट्रेलियाची 24 वर्षाची महिला क्रिकेटर जोसेफिन डुलीची प्रकृती अचानक ढासळली होती. तिला झटका आला होता. डुली बिग बॅश लीगमध्ये रेनेगेड्सकडून खेळते. डुलीला हा झटका 15 एप्रिलला आला, तेव्हा ती हवाईला सुट्ट्यांवर गेली होती. झटका आल्यानंतर तिच्यावर ब्रेन सर्जरी करण्यात आली. जोसेफिन डुलीला 30 दिवस रुग्णालयात ठेवलं. सध्या ब्रिसबेनच्या रुग्णालयात जोसेफिन डुलीवर उपचार सुरु आहेत. साऊथ ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोशिएशननुसार, 15 एप्रिलला ती हवाईच्या एका बेटावर सुट्टया एन्जॉय करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिला स्ट्रोक आला.
झटका आल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जोसेफिन डुलीला एअरलिफ्ट करुन हवाईची राजधानी होनोलूलू येथे नेण्यात आलं. जेणेकरुन तात्काळ प्रभावाने न्युरोसर्जिकल ट्रीटमेंट देता येईल. तिच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. 18 दिवस ती ICU मध्ये होती. 12 दिवसांसाठी तिला न्युरोसर्जिकल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियन क्रिकेटरची ब्रेन सर्जरी होनालूलूच्या क्वींस हॉस्पिटलमध्ये झाली. 30 दिवसानंतर जोसेफिन डुलीला पूर्णपणे फिट घोषित करण्यात आलं.
डुलीच क्रिकेट करिअर कसं आहे?
तिला होम टाऊन ब्रिसबेन येथे नेण्यात आलं. तिथे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जोसेफिन डुलीच्या प्रकृतीत आता सुधारणा होतेय. कठीण काळात साथ देण्यासाठी तिने मित्र आणि क्रिकेट फॅन्सचे आभार मानलेत. जोसेफिन डुलीने अजूनपर्यंत ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय डेब्यु केलेला नाही. तिने WBBL मध्ये वर्ष 2018-19 मध्ये ब्रिसबेन हीट्सकडून खेळताना डेब्यु केला होता. सध्या ती मेलबर्न रेनेगेड्स टीमचा भाग आहे. मागच्या सीजनमध्ये या टीमसाठी ती 14 मॅच खेळली होती. जोसेफिन डुली मागच्यावर्षी साऊथ ऑस्ट्रेलियासाठी 11 वनडे मॅच खेळली आहे, यात तिने 285 धावा केल्या आहेत. डुली आता युवा आहे. तिला अजून बरच क्रिकेट खेळायच आहे.