IND vs AUS : Rohit Sharma-विराटला भिडण्याआधीच ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर हिम्मत हरला?
IND vs AUS : भारत दौऱ्यावर येण्याआधी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या वक्तव्यावरुन त्याने आधीच शस्त्र खाली ठेवलय असं वाटतय. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.
IND vs AUS Test Series : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. ही सीरीज सुरु होण्याआधीच ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजाने शस्त्र खाली ठेवलय. बॉर्डर-गावस्कर सीरीज दरम्यान भारतीय पीचेसवर बॉलिंग करणं आव्हानात्मक असेल, असं ऑस्ट्रेलियन युवा वेगवान गोलंदाज लान्स मॉरिसच मत आहे. भारतात शिकायला मिळेल, ती संधी मी सोडणार नाही, असं मॉरिस म्हणाला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन टीम उद्या भारतात दाखल होईल.
भारताविरुद्ध मिळू शकते संधी
ऑस्ट्रेलियाने 24 वर्षीय लान्स मॉरिसला 18 सदस्यीय टेस्ट टीममध्ये स्थान दिलय. सिडनीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम कसोटीत त्याची डेब्युची संधी हुकली. भारताविरुद्ध चार कसोटी सामन्यात त्याला ऑस्ट्रेलियन टीममधून संधी मिळू शकते.
फीडबॅक फार चांगला नाहीय
“प्रामाणिकपणे सांगायच झाल्यास, फीडबॅक फार चांगला नाहीय. अनेक गोष्टींबद्दल मी फार उत्सुक नाहीय. मला चेंडू वेगाने विकेटकीपरकडे जाताना दिसणार नाही. ही स्थिती थोडी आव्हानात्मक असली, तरी रोमांचक असेल” असं मॉरिस एसईएन रेडिओवर बोलताना म्हणाला.
स्वत:कडून फार अपेक्षा नाहीयत
अनुभवी खेळाडूंची सोबत आणि भारतीय खेळपट्टयांवर गोलंदाजी शिकणं या पलीकडे लान्स मॉरिसला जास्त अपेक्षा नाहीयत. “आमच्या टीममध्ये काही दिग्गज खेळाडू आहेत. आमची अनुभवी टीम आहे. काही ट्रेनिंग सेशन्समध्ये त्यांच्याकडून शिकायला मिळणं ही चांगली बाब आहे. मला स्वत:कडून फार अपेक्षा नाहीयत. मी याआधी कधी टीमसोबत दौऱ्यावर गेलेलो नाही. माझ्यासाठी हा पहिला परदेश दौऱ्याच अनुभव आहे. माझ्यासाठी ही शिकण्याची मोठी संधी आहे” असं मॉरिसने सांगितलं. लान्स मॉरिसला यशाचा विश्वास नाही
लान्स मॉरिसच्या वक्तव्यामधून त्याच्यामध्ये असलेल्या आत्मविश्वासाची कमतरता दिसून येते. भारतातील विकेट्सवर वेगवान गोलंदाजांना सुद्धा मदत मिळते. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव सारखे गोलंदाज भारतात कमालीची गोलंदाजी करतात. हे सत्य आहे की, स्पिनर्सचा रोल महत्त्वाचा असतो. चेंडू जुना झाल्यानंतर भारतातही वेगवान गोलंदाजांचे चेंडू रिव्हर्स स्विंग होतात.