अरेरे! याहून खराब गोलंदाजी पाहिली नसेल, 97 ओव्हर टाकल्या, 281 धावा लुटवल्या, तेव्हा जाऊन पहिली विकेट मिळाली
आतापर्यंत क्रिकेट इतिहासांत अनेक गोलंदाज झाले. काहींनी अप्रतिम गोलंदाजीने इतिहास रचला तर काहींची गोलंदाजी इतकी खराब होती की त्यांना एखाद दुसऱ्या मालिकेनंतर कधी संघातही जागा देण्यात आली नाही.
मुंबई : अनेकदा एक विकेट मिळवण्यासाठी गोलंदाजाना बरीच प्रतिक्षा करावी लागते. टी-20 क्रिकेटमध्ये आक्रमक खेळ असला तरी कधी कधी एखाद्या गोलंदाजाला 4 ओव्हरनंतरही विकेट मिळत नाही. तर एकदिवसीय सामन्यातही 10 ओव्हर टाकल्यानंतरही गोलंदाजाला एकही विकेट मिळत नाही. टेस्टमध्ये ही प्रतिक्षा आणखी अधिक असते. पण आज आपण ज्या गोलंदाजाबद्दल बोलतोय त्याला पहिली विकेट मिळवण्यासाठी थोडा-थोडकी नाही तर तब्बल 97 ओव्हर्सची वाट पाहावी लागली होती.
या गोलंदाजाने 584 चेंडू टाकल्यानंतर 281 धावा लुटवल्यावर पहिला विकेट मिळवला. या खेळाडूबद्दल आज बोलण्याचे कारण की, त्याचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 16 जुलैला झाला होता. जॉन वर (John Warr) असं या खेळाडूच नाव असून ते ऑस्ट्रेलियाई क्रिकेट (Australia Cricket Team) संघातील खेळाडू होते. त्यांचा जन्म 16 जुलै 1927 रोजी झाला होता. ते जॉन मेरिलबोन क्रिकेट क्लबचे अध्यक्ष ही राहिले होते. तसेच इंग्लंड काउंटी चॅम्पियनशिपच्या टीम मिडलसेक्सचे कर्णधारपदही भूषवले होते. दरम्यान ऑस्ट्रेलिया संघातून ते केवळ दोनच टेस्ट खेळले. ज्यामध्ये त्यांनी केवळ 4 रन बनवले आणि गोलंदाजीचही खास कमाल करु शकले नाही. त्यांनी दोन सामन्यांतील 4 डावांत मिळून केवळ एकच विकेट घेतला. यावेळी त्यांनी 97 ओव्हर म्हणजेच 584 चेंडू टाकले. ज्यानंतर 281 धावा दिल्यानंतर त्याला एकमात्र विकेट मिळाला.
344 सामन्यांत मिळवले 956 विकेट्स
जॉन वर यांनी ऑस्ट्रेलिया संघातू दोनच टेस्ट मॅच खेळले. ज्यात 5 ते 9 जनवरी 1951 मध्ये इंग्लंडविरुद्ध सिडनीमध्ये त्यांनी सलामीचा सामना खेळला होता. त्यानंतर एडिलेड येथे 2 ते 8 फेब्रुवारी 1951 दरम्यान इंग्लंडविरुद्धच दुसरी आणि शेवटची टेस्ट मॅच खेळली होती. आंतरराष्ट्रीय कारकीर्द सोडता प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मात्र त्यांनी 344 सामने खेळले. ज्यात तब्बल 956 फलंदाजाना त्यांनी तंबूत धाडलं. यावेळी दोन डावांत 65 धावा देऊन 9 विकेट घेणं हे त्यांच सर्वश्रेष्ठ प्रदर्शन होतं.
संबंधित बातम्या
भारतीय संघावर कोरोनाचा घाला, पंत पाठोपाठ आणखी एकाला कोरोनाची बाधा, तर तिघेजण विलगीकरणात
के एल राहुलकडे विकेटकीपिंगची धुरा, सराव सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर
(Australian Bowler Cricketer MCC President John Warr Birthday on this day Marathi)