World Cup 2023 | एक भारतीय स्पिनरच ऑस्ट्रेलियाकडे उत्तर नाही, मात्र तरीही कमिन्सचा आवेश असा, आम्ही नाही घाबरत

IND vs AUS World Cup 2023 | मॅचआधी पॅट कमिन्सने काय गर्जना केलीय? भारतीय स्पिनर्सना कसं तोंड देणार? पॅट कमिन्सने सांगितला Action प्लान. वनडे सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाची कमतरता उघड झाली होती.

World Cup 2023 | एक भारतीय स्पिनरच ऑस्ट्रेलियाकडे उत्तर नाही, मात्र तरीही कमिन्सचा आवेश असा, आम्ही नाही घाबरत
Ind vs Aus World cup 2023Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 11:16 AM

चेन्नई : वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 ऑक्टोबरला होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. वर्ल्ड कपआधी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीज खेळली. या मालिकेत टीम इंडियाने 2-1 असा विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला असता, तर तो क्लीन स्वीप ठरला असता. या मालिकेत भारताच्या फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चांगलच सतावलं. खासकरुन आर.अश्विनच्या चेंडूंच ऑस्ट्रेलियन फलंदाजांकडे काहीच उत्तर नव्हतं. मात्र, तरीही ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स भारतीय स्पिन गोलंदाजांना धोकादायक मानत नाही. आमच्याकडे भारतीय स्पिन गोलंदाजीचा सामना करण्याचा प्लान आहे, असं कमिन्सने सांगितलं.

राजकोट वनडेमध्ये टीम इंडियावर विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावलया असं कमिन्सने सांगितलं. “भारताविरुद्धच्या सामन्याची आमची तयारी सुरु आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज स्पिन गोलंदाजीविरुद्ध सराव करतायत. आमच्या अनेक फलंदाजांकडे भारतात खेळण्याचा अनुभव आहे. ते सगळे भारतीय गोलंदाजांची कमतरता आणि गुण जाणतात. त्या दृष्टीने प्लान तयार आहे” असं पॅट कमिन्स म्हणाला. ड्यू फॅक्टरबद्दल बोलताना पॅट कमिन्स म्हणाला की, “वर्ल्ड कपवर दवाचा परिणाम जाणवेल. हे प्रत्येक मॅचच्या ठिकाणावर अवलंबून आहे. टी 20 मध्ये याचा परिणाम जास्त होतो. कारण दुसरी इनिंग सुरु व्हायच्यावेळीच दवाचा परिणाम दिसू लागतो. चेंडू ओला होण्यास सुरुवात होते” कमिन्सने त्या प्रश्नावर काय उत्तर दिलं?

आयपीएल खेळण्याचा ज्यांच्याकडे अनुभव आहे, अशा खेळाडूंना टीममध्ये ठेवल्यामुळे भारताला मायदेशात खेळण्याचा तितका फायदा मिळणार नाही का? या प्रश्नावर कमिन्स म्हणाला की, “कदाचित थोडसा फायदा कमी होईल. आमच्या टीममधील बऱ्याच प्लेयर्सनी भारतात बरेच सामने खेळले आहेत. आयपीएलचा सुद्धा अनुभव आहे. घरच्या मैदानात आपल्या लोकांसमोर अनुकूल खेळपट्टीवर खेळण्याचे काही फायदे आहेत. पण आम्ही याआधी सुद्धा अशा परिस्थितीचा सामना केलाय. त्यामुळे यावेळी सुद्धा आमच्यासाठी काही वेगळं नसेल. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आम्ही आमच्याबाजूने सर्व प्रयत्न करु”

बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.