Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ फलंदाजाने 26 चेंडूत ठोकल्या 124 धावा, आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील सर्वात मोठा रेकॉर्डही केला नावे

टी-20 क्रिकेट म्हटलं तर सर्वांत धडाकेबाज फलंदाज म्हणून वेस्ट इंडिज संघाच्या ख्रिस गेलकडेच पाहिलं जात. बरेच रेकॉर्डही त्याच्याच नावे आहे. पण एका आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड गेलच्या नावावर नसून एका वेगळ्याच खेळाडूच्या नावावर आहे.

'या' फलंदाजाने 26 चेंडूत ठोकल्या 124 धावा, आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील सर्वात मोठा रेकॉर्डही केला नावे
एरॉन फिंच
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 1:17 PM

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सध्या सर्वांत स्फोटक फलंदाज म्हणजे वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (Chris Gayle). वेस्ट इंडिजचा गेल, आंद्रे रस्सेल (Andre russel), केइरॉन पोलार्ड (Pollard) या साऱ्यांनाच टी-20 चे धाकड खेळाडू म्हणून संबोधलं जातं. आंतरराष्ट्रीय टी- 20 क्रिकेटमधील जास्त रेकॉर्डही यांच्याच नावांवर आहेत. पण आंतरराष्‍ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये (International T20 Cricket) सर्वाधिक व्‍यक्तिगत स्‍कोर हा या कोणाच्या नावावर नसून ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर एरॉन फिंच (Aaron Finch)  याच्या नावावर आहे. फिंचने आजच्याच दिवशी म्हणजे 3 जुलै, 2018 रोजी झिम्‍बाब्‍वे संघाविरोधात 76 चेंडूंत 172 धावा करत एक नवा विक्रम केला होता. विशेष म्हणजे यात 124 धावा या त्याने 26 चेंडूत चौकार आणि  षटकारांच्या मदतीने केल्या होत्या. (Australian cricketer Aaron Finch 172 is highest Score in T-20 international which he hit Against Zimbabwe on this Day)

सामन्यात ऑस्‍ट्रेलियाने प्रथम फलंदाजी घेतली.  डी आर्सी शॉर्टसोबत कर्णधार एरॉन फिंच सलामीला आला. मैदानावर पाऊल ठेवता फिंचने धडाकेबाज खेळी करायला सुरुवात केली. 76 चेंडू दमदार खेळी केल्यानंतर हिटविकेट होऊन फिंच बाद झाला. पण तोवर त्याने 16 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 172 धावांचा डोंगर रचला होता. सोबत शॉर्टने 42 चेंडूंत 46 धावा केल्याने दोघांनी पहल्या विकेटसाठी 19.2 ओव्हरमध्ये 223 धावा केल्या. त्यानंतर झिम्‍बाब्‍वे संघाने 20 ओव्हरमध्ये 9 विकेटच्या बदल्यात केवळ 129 धावा केल्या आणि 100 धावांनी सामना पराभूत झाली.

क्रिस गेलच्या नावे 175 धावा

आंतरराष्‍ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये फिंचनंतर सर्वाधिक स्‍कोर अफगानिस्‍तानच्या हजरतुल्‍लाह जजाईच्या नावावर आहे. त्याने 2019 मध्ये आयर्लंडविरोधात 62 चेंडूत नाबाद 162 धावांची खेळी केली होती. दरम्यान टी-20 क्रिकेट फॉर्मेटता विचार करता सर्वाधिक स्कोर हा ख्रिस गेलच्याच नावावर आहे. त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) 2013 च्या सीजनमध्ये रॉयल चँलेंजर्स बंगळुरूकडून 175 धावांची जबरदस्त खेळी केली होती. पुणे वॉरीयर्स संघाविरोधात गेलने ही असामान्य खेळी केली होती.

हे ही वाचा :

14 षटकार मारुन धावांचा पाऊस पाडला, गोऱ्या मॅम फिदा, आयुष्यभर साथ देण्याचं वचन, पाहा तो क्रिकेटर कोण?

आज ब्लू है पानी पानी, टीम इंडियाची श्रीलंकेत धमाल मस्ती, पाहा PHOTO

भारत-श्रीलंका दौऱ्यापूर्वी वादाला तोंड, पाच खेळाडूंचा खेळण्यास नकार

(Australian cricketer Aaron Finch 172 is highest Score in T-20 international which he hit Against Zimbabwe on this Day)

फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.
त्याचं नाव जरी घेतलं तरी माझ्या जिभेला लकवा.., रामराजेंचा रोख कोणावर?
त्याचं नाव जरी घेतलं तरी माझ्या जिभेला लकवा.., रामराजेंचा रोख कोणावर?.
तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला
तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला.
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं.
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत..
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत...