इंग्लंडमध्ये ऐतिहासिक विजयानंतर दोन खेळाडूंची एकत्र निवृत्ती, दोघेही दिग्गज फलंदाज

इंग्लंडच्या भूमित संघाला पाच सामन्यांच्या कसोटीत एक ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर दोन दिग्गज फलंदाजानी एकत्रच क्रिकेटमधून संन्यास घेतला होता.

इंग्लंडमध्ये ऐतिहासिक विजयानंतर दोन खेळाडूंची एकत्र निवृत्ती, दोघेही दिग्गज फलंदाज
कसोटी सामना (प्रतिकात्मक फोटो)
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 11:26 AM

लंडन : क्रिकेटच्या इतिहासात एकाच दिवशी एकापेक्षा अधिक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले सामने आपण पाहिले असतील. पण एकाहून अधिक खेळाडूंनी एकाच सामन्यात निवृत्ती घेतल्याचे प्रसंग फार दुर्मिळ. असाच एक सामना झाला होता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दिग्गज संघात. ज्यात इंग्लंडच्या मैदानात सामन्यानंतर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत ऑस्ट्रेलिया संघाच्या एक नाही दोन दिग्गज फलंदाजानी क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. यातील एक मधल्या फळीतील विश्वासू फलंदाज तर दुसरा सलामीवीर होता. यांच्याबद्दल आज सांगण्याचे कारण म्हणजे दोघांनीही आजच्याच दिवशी म्हणजे 23 ऑगस्ट रोजी निवृत्ती घेतली होती.

2015 साली आजच्याच दिवशी ऑस्‍ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार मायकल क्‍लार्कसह (Michael Clarke) सलामीवीर क्रिस रॉजर्सने (Chris Rogers) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. इंग्‍लंडच्या (England) मैैदानात 20 ते 23 ऑगस्‍टच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्‍ट्रेलियाने 46 धावांनी  विजय मिळवला होता. सामन्यात प्रथम फलंदाजीवेळीच ऑस्ट्रेलियाने 481 धावांचा डोंगर उभा केला. यावेळी स्‍टीव स्मिथने 143 धावा तर डेव्हिड  वॉर्नरने 85 तर एडम वोजेसने 76 धावांची खेळी केली. मायकल क्लार्क मात्र 15 धावाच करु शकला. तर गोलंदाजीत इंग्लंडकडून बेन स्‍टोक्‍स, स्‍टीवन फिन आणि मोइन अली यांनी 3-3 फलंदाजाना माघारी धाडलं.

149 धावांत इंग्लंडचा डाव संपुष्टात

इंग्‍लंडचा पहिला डाव मात्र अवघ्या 149 धावांवर आटोपला. यामध्ये सर्वाधिक धावा या मोईन अलीने (30) केल्या.  ऑस्‍ट्रेलियाकडून मिचेल जॉन्सन आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. ज्यामुळे ऑस्‍ट्रेलियाने इंग्‍लंडला फॉलोऑन दिला. ज्यानंतर दुसऱ्या डावातही इंग्लंड केवळ 286 धावांच करु शकली. ज्यानंतर सामना आणि मालिका त्यांच्या हातातून निसटली. दरम्यान या उत्कृष्ट विजयानंतर मायकल क्लार्क आणि क्रिस रॉजर्सने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

क्‍लार्क आणि रॉजर्सची कसोटी कारकिर्द

सामना संपताच क्‍लार्क आणि रॉजर्स यांनी कसोटी क्रिकेटला अलविदा केला. दरम्यान क्‍लार्कने 115 कसोटी सामन्यात 49.10 च्या सरासरीने 28 शतकं आणि 27 अर्धशतकं ठोकली. ज्यामुळे त्याच्या नावावर 8 हजार 643 धावा होत्या. नाबाद 329 हा त्याला सर्वोच्च स्कोर होता. तर रॉजर्सने 25 कसोटी सामन्यात 42.87 च्या सरासरीने 5 शतकं आणि 14 अर्धशतकं ठोकली. ज्याच्या मदतीने त्याने 2 हजार 15 धावा केल्या. 173 हा त्याचा सर्वोच्च स्कोर होता.

हे ही वाचा

IND vs ENG : इंग्लंड संघावर संकट, शेवटच्या कसोटीसाठी दिग्गज खेळाडू हुकणार

राहुल द्रविडचा भारतीय संघात ‘या’ पदासाठी अर्ज, द्रविडच्या निर्णयाचे पाकिस्तानपासून ऑस्ट्रेलियापर्यंत स्वागत

इंग्लंडच्या मैदानात ‘या’ गोलंदाजाची अफलातून कमाल, सात हॅट्रीक घेत रचला इतिहास

(Australian cricketer michael clarke and Chris rogers retired on this day at England)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.