Cricketer Retirement | ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या क्रिकेटपटूने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिला धक्का, मोठी घोषणा

Cricketer Retirement | ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधून एक मोठी बातमी आहे. त्यांच्या एका मोठ्या क्रिकेटरने टेस्टनंतर वनडेमधून निवृत्तीची घोषणा केलीय. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी या क्रिकेटपटूने क्रिकेट विश्वाला धक्का दिलाय. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय सामने गाजवले आहेत.

Cricketer Retirement | ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या क्रिकेटपटूने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिला धक्का, मोठी घोषणा
AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाने दुसरी कसोटी जिंकत मालिका घातली खिशात, पाकिस्तानच्या फलंदाजांचं अपयश
Follow us
| Updated on: Jan 01, 2024 | 7:45 AM

Cricketer Retirement : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या एका मोठ्या क्रिकेटपटूने क्रिकेट विश्वाला धक्का दिलाय. त्याने आता वनडे क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा केलीय. टेस्ट क्रिकेटमधून त्याने निवृत्तीची घोषणा आधीच केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या क्रिकेटपटूने आपल्या तडाखेबंद फलंदाजीने अनेक सामने गाजवले. पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची त्याची सवय होती. ऑस्ट्रेलियासाठी त्याने गेली अनेक वर्ष महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या फलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अनेक सामन्यात सहज विजय मिळवला. त्याने आपल्या बॅटिंगने अनेक सामने फिरवले. त्याची फलंदाजी म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी असायची. चौफेर फलंदाजी करण्याची हातोटी असलेला हा क्रिकेटपटू मैदानावर अगदी सहज चौकार-षटकारांचा पाऊस पाडायचा. टेस्ट पाठोपाठ आता वनडेमध्ये क्रिकेट रसिकांना त्याची ही धुवाधार फलंदाजी पाहता येणार नाहीय. पाकिस्तान विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर शेवटचा कसोटी सामना खेळणार हे त्याने आधीच जाहीर केलं होतं.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी कसोटी सामना 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. टेस्ट मॅच सुरु होण्याआधीच डेविड वॉर्नरने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. डेविड वॉर्नरच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीवर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. टेस्ट सोडल्यानंतर क्रिकेटच्या दुसऱ्या फॉर्मेटमध्ये कधीपर्यंत खेळणार? हा प्रश्न होता. ऑस्ट्रेलियन टीममध्ये त्याच भविष्य काय असेल? पण वॉर्नरने जास्त प्रतिक्षा करायला न लावता या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. वनडे क्रिकेटमधून सन्यास हा त्याचाच एक भाग आहे. सिडनीमध्ये पत्रकार परिषदेत डेविड वॉर्नरने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आपल्या शेवटच्या कसोटीआधी त्याने पत्रकार परिषद घेतली. टेस्ट आणि वनडे दोघांमधून रिटायर होत असल्याच त्याने सांगितलं. म्हणजे भारताविरुद्ध वनडे वर्ल्ड कपची फायनल डेविड वॉर्नरच्या करिअरमधील शेवटची वनडे मॅच होती.

वनडेमध्ये त्याचा रेकॉर्ड काय?

डेविड वॉर्नरने 14 वर्ष वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाच प्रतिनिधीत्व केलं. 2009 मध्ये डेब्यु केल्यानंतर वर्ष 2023 मध्ये तो वनडेचा शेवटचा सामना खेळला. त्याने वनडे करिअरमध्ये एकूण 161 सामने खेळले. यात 45.30 च्या सरासरीने 6932 धावा केल्या. 179 त्याची बेस्ट धावसंख्या आहे. त्याने 22 सेंच्युरी आणि 33 हाफ सेंच्युरी झळकवल्या. त्याशिवाय या फॉर्मेटमध्ये वॉर्नरने 733 फोर आणि 130 सिक्स मारले. ऑस्ट्रेलियासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो सहावा फलंदाज आहे.

T20 क्रिकेट खेळत राहणार का?

टेस्ट आणि वनडेमधून रिटायर झाल्यानंतर तो T20I क्रिकेट खेळत राहणार का? हा प्रश्न आहे. क्रिकेटच्या या छोट्या फॉर्मेटमध्ये तो ऑस्ट्रेलियासाठी उपलब्ध असेल. म्हणजेच तो T20 क्रिकेट खेळत राहील.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.