Team India Coach : BCCI ला झटका, प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने कोच बनण्याची नाकारली ऑफर
Team India Coach : टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी सध्या वेगवेगळी नाव चर्चेत आहेत. एका प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने या बाबत खुलासा केला आहे. राहुल द्रविड यांचा बीसीसीआय सोबतचा कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने आतापासूनच टीम इंडियासाठी नव्या हेड कोचचा शोध सुरु केला आहे.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून टीम इंडियासाठी हेड कोचचा शोध सुरु आहे. आयपीएल 2024 चा सीजन संपल्यानंतर T20 वर्ल्ड कप सुरु होतोय. जून महिन्यात T20 वर्ल्ड कप आहे. त्यानंतर राहुल द्रविड यांचा बीसीसीआय सोबतचा कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने आतापासूनच टीम इंडियासाठी नव्या हेड कोचचा शोध सुरु केला आहे. स्वत: राहुल द्रविड सुद्धा हेड कोच पदावर राहण्यात इच्छुक नाहीयत. टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी वेगवेगळी नाव पुढे येत आहेत. काही नावाजलेले परदेशी खेळाडू, प्रशिक्षक सुद्धा यामध्ये आहेत. पण कोचिंगचा अनुभव असलेले परदेशी खेळाडू नकार देतायत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने याबाबत खुलासा केला आहे. रिकी पॉन्टिंग आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कोच आहे.
बीसीसीआयने कोच पदासाठी आपल्याशी संपर्क साधला होता, असा खुलासा पॉन्टिंगने केलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा व्यस्त कार्यक्रम लक्षात घेता, आपल्याला त्यात अडकायच नाहीय, असं पॉन्टिंगने म्हटलय. पॉन्टिंग मागच्या सात सीजन पासून दिल्ली कॅपिटल्सचा कोच आहे. दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी संमिश्र राहिली आहे. यंदाच्या सीजनमध्ये थोडक्यात दिल्ली कॅपिटल्सची प्लेऑफची संधी हुकली. टीम इंडियाच्या हेड कोचच्या ऑफरबाबत रिकी पॉन्टिंग म्हणाला की, “मी बरेच रिपोर्ट्स पाहिले आहेत. तुम्हाला समजण्याआधी अशा गोष्टी सोशल मीडियावर येतात”
टीम इंडियाचा हेड कोच पदासाठी अजून कोणाची नाव?
“राष्ट्रीय संघाला कोचिंग करायला मला आवडेल. मला काही अन्य गोष्टी माझ्या आयुष्यात आहेत. मला घरी वेळ द्यायचा आहे. तुम्ही टीम इंडियाचा कोच बनलात, तर तुम्ही आयपीएलमध्ये राहू शकत नाही हे सर्वांना माहितीय” असं रिकी पॉन्टिंग म्हणाला. “हेड कोच म्हणून वर्षातले 10 ते 11 महिने काम असणार आहे. सध्या माझ्या लाइफस्टाइलमध्ये ही गोष्ट बसत नाही” असं रिकी पॉन्टिंग म्हणाला. टीम इंडियाच हेड कोच बनण्यासाठी स्टीफन फ्लेमिंग, गौतम गंभीर यांची नाव सुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आहेत.