Shane Warne Death: कसे होते शेन वॉर्नचे शेवटचे क्षण, नेमकं त्यावेळी काय घडलं? कशी होती रुमची स्थिती
Shane Warne Death: काल संध्याकाळी क्रिकेट विश्वाला एक धक्का देणारी बातमी समोर आली. ऑस्ट्रेलियाचे महान लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) यांचं अकाली निधन झालं. अजूनही अनेकांना यावर विश्वास बसत नाहीय.
सिडनी : काल संध्याकाळी क्रिकेट विश्वाला एक धक्का देणारी बातमी समोर आली. ऑस्ट्रेलियाचे महान लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) यांचं अकाली निधन झालं. अजूनही अनेकांना यावर विश्वास बसत नाहीय. असं कसं घडू शकतं? असाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे. थायलंडच्या (Thailand) एका व्हिलामध्ये शेन वॉर्न यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 52 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शेन वॉर्न यांचं निधन झाल्याची शक्यता आहे. थायलंडच्या कोह सामुई येथील सामुजाना व्हिलामध्ये (Samujana Villa) शेन वॉर्न उतरले होते. वॉर्न यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिथल्या स्विमिंग पूलचा गुड नाइट लिहिलेला फोटो पोस्ट केला होता. तोच वॉर्न यांचा अखेरचा मेसेज ठरला.
सर्वात आधी तिथे पोहोचलेल्या रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्याने काय पाहिलं?
अखेरच्या क्षणी शेन वॉर्न सोबत त्याचे मित्र होते. सर्वप्रथम वॉर्नच्या मित्रानेच त्याला जमिनीवर निपचित पडलेलं पाहिलं. दुपारच्या जेवणासाठी म्हणून तो शेन वॉर्नला बोलवायला त्याच्या रुममध्ये गेला होता. अनेक हाका मारुनही शेन वॉर्न काहीच प्रतिसाद देत नव्हता. “आम्ही घटनास्थळी पोहोचलो. त्यावेळी आम्ही शेन वॉर्नला जमिनीवर निपचित पडलेलं पाहिलं” असं रुग्णावाहिकेच्या कर्मचाऱ्याने सांगितलं. शेन वॉर्नच्या मित्राने त्याला सीपीआर देऊन त्याचा श्वासोश्वास सुरु करण्याचा प्रयत्न केला. आम्ही थाय इंटरनॅशनल हॉस्पिटलकडेही मदत मागितली, असे शेन वॉर्नसोबत असलेल्या मित्राने सांगितले. सेवन न्यूज डॉट. कॉमने हे वृत्त दिलं आहे.
Shocked, stunned & miserable…
Will miss you Warnie. There was never a dull moment with you around, on or off the field. Will always treasure our on field duels & off field banter. You always had a special place for India & Indians had a special place for you.
Gone too young! pic.twitter.com/219zIomwjB
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 4, 2022
रुमची स्थिती काय होती?
शेन वॉर्नचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेल्याची माहिती थाय पोलिसांनी दिली. वॉर्नच्या व्हिलामध्ये गेलेल्या रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्याने शेन वॉर्नचा संशयास्पद मृत्यू झाल्याची कुठलही चिन्ह दिसलं नाही असं सांगितलं. शेन वॉर्नच्या शरीरावर कुठल्याही जखमा नव्हत्या किंवा कुठला संघर्ष झाल्याचही दिसत नव्हतं अशी रुग्णावाहिकेच्या त्या कर्मचाऱ्याने माहिती दिली. रुमची स्थिती खूप सामान्य होती. सगळं सामान जागच्या जागी होतं. शेन वॉर्न आपला रुममध्ये झोपला आहे, असंच वाटत होतं. एसी सुरु होता असं त्या कर्मचाऱ्याने सांगितलं. ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू रॉड मार्श यांच्या निधनाननंतर 24 तासात शेन वॉर्नचा मृत्यू झाला. वॉर्नने स्वत: त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.