David Warner | ‘आमच स्वागत नेहमीच चांगलं होतं’, भारतात पोहोचताच सिक्युरिटी स्टाफसोबत डेविड वॉर्नरचा सेल्फी

India Vs Australia ODI Series | भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 22 सप्टेंबरपासून वनडे सीरीज सुरु होणार आहे. पहिल्या दोन वनडेत भारताचे सिनियर खेळाडू खेळताना दिसणार नाहीत.

David Warner | 'आमच स्वागत नेहमीच चांगलं होतं', भारतात पोहोचताच सिक्युरिटी स्टाफसोबत डेविड वॉर्नरचा सेल्फी
David WarnerImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 10:58 AM

मोहाली : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये वनडे सीरीज सुरु झाली आहे. 22 सप्टेंबरला पहिला सामना झाला. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये 3 वनडे सामन्यांची सीरीज होणार आहे. पहिल्या दोन वनडेसाठी सिनियर खेळाडूंना आराम देण्यात आलाय. तिसऱ्या वनडेत सिनियर्स पुनरागमन करतील. वनडे सीरीज आणि वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियन टीम भारतात आलीय. ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेविड वॉर्नरने भारतात दाखल झाल्यानंतर एका खास फोटो शेयर केलाय. सोशल मीडियावर या फोटोची चर्चा आहे. वॉर्नरने एअरपोर्टवर सिक्युरिटी स्टाफसोबत एक फोटो काढला. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होतोय. “भारतात आल्यानंतर आमच नेहमीच चांगलं स्वागत होतं. आमची नेहमीच चांगली काळजी घेतली जाते. खूप, खूप आभार” वॉर्नरच्या या फोटोवर फॅन्सकडून वेगवेळ्या कमेंटस केल्या जात आहेत.

वर्ल्ड कपआधी ही वनडे सीरीज म्हणजे दोन्ही टीम्ससाठी सराव करण्याची चांगली संधी आहे. वनडे सीरीजनंतर टीम इंडिया वर्ल्ड कपआधी सराव सामना खेळणार आहे. पहिला सराव सामना 30 सप्टेंबरला इंग्लंड विरुद्ध होईल. त्यानंतर 2 ऑक्टोबरला दुसरा सराव सामना होईल. 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याने टीम इंडिया आपल्या वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात करणार आहे.

पहिल्या दोन वनडेसाठी टीम इंडिया

केएल राहुल (कॅप्टन), (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज. ऑस्ट्रेलियन टीम

पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरुन ग्रीन, जोश हेजलवुड, जोश इंग्लिस, स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, एडम झम्पा,

Non Stop LIVE Update
मुसळधार पावसाचा फटका, मुंबई मनपा कंट्रोल रुम रात्रीपासून सज्ज
मुसळधार पावसाचा फटका, मुंबई मनपा कंट्रोल रुम रात्रीपासून सज्ज.
दाणादाण करत पावसाचं कमबॅक, लोकल ठप्प; चाकरमान्यांचा प्रचंड त्रागा
दाणादाण करत पावसाचं कमबॅक, लोकल ठप्प; चाकरमान्यांचा प्रचंड त्रागा.
Mumbai Rains Update : मुंबईतील मुसळधार पावसाचा आमदारांनाही फटका
Mumbai Rains Update : मुंबईतील मुसळधार पावसाचा आमदारांनाही फटका.
अजित दादांच्या पत्नीनं लाटल्या वारक-यांसाठी चपात्या, बघा व्हिडीओ
अजित दादांच्या पत्नीनं लाटल्या वारक-यांसाठी चपात्या, बघा व्हिडीओ.
ठाकरेंचा लाडकी बहीणवरून निशाणा, खोतकरांच्या त्या व्हिडीओचा दिला दाखला
ठाकरेंचा लाडकी बहीणवरून निशाणा, खोतकरांच्या त्या व्हिडीओचा दिला दाखला.
आपले 7-8 मुख्यमंत्री होऊ द्या, त्यात मुस्लिम..,जरांगेंचा सरकारला इशारा
आपले 7-8 मुख्यमंत्री होऊ द्या, त्यात मुस्लिम..,जरांगेंचा सरकारला इशारा.
विधानसभा-लोकसभेत पाठिंबा देणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले.
विधानसभा-लोकसभेत पाठिंबा देणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले..
'लाडकी बहीण'वरून उद्धव ठाकरेंचा पहिल्यांदाच बोलले, घरातील बहीण-भावात..
'लाडकी बहीण'वरून उद्धव ठाकरेंचा पहिल्यांदाच बोलले, घरातील बहीण-भावात...
कोकणरेल्वेचा खोळंबा; रूळावर पाणी,एक्स्प्रेस अडकल्या, प्रवाशांची पायपीट
कोकणरेल्वेचा खोळंबा; रूळावर पाणी,एक्स्प्रेस अडकल्या, प्रवाशांची पायपीट.
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली..
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली...