ऑस्ट्रेलियाचा झम्पा गुलबदिन नायबवर संतापला, वॉनने घेतला खरपूस समाचार

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यात गुलबदिन नायबने केलेल्या कृतीमुळे त्याच्यावर आता टीका होऊ लागली आहे. या घटनेमुळे ॲडम झाम्पा आणि मायकेल वॉन चांगलेच संतापले आहेत. अफगाणिस्तानच्या विजयामुळे ऑस्ट्रेलिया संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

ऑस्ट्रेलियाचा झम्पा गुलबदिन नायबवर संतापला, वॉनने घेतला खरपूस समाचार
Follow us
| Updated on: Jun 25, 2024 | 4:13 PM

अफगाणिस्तानने बांगलादेशवर डकवर्थ लुईस (DLS) नियमानुसार विजय मिळवला आहे. त्यामुळे अफगाणिस्तान टी20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत पोहोचणारा चौथा संघ ठरलाय. मात्र या विजयानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूवर टीका होऊ लागली आहे. बांगलादेशच्या डावाच्या 12व्या ओव्हरमध्ये गुलबदिन नायबची दुखापत क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनली आहे. ज्याला लोक ‘फेक इंजरी’ म्हणत आहेत. अफगाणिस्तान DLS धावसंख्येपेक्षा थोडा पुढे होता, सामन्या दरम्यान अनेकदा पाऊस पडल्याने खेळात व्यत्यय आला होता. याचाच फायदा घेत अफगाण संघाचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी डग आऊटमधून खेळाडूंना इशारा केला आणि सामना लांबवण्याचा इशारा दिला.

गुलबदीन नायब हा स्लिपमध्ये उभा होता. त्यानंतर तो अचानक पायाला धरून मैदानावर पडला. त्याला दुखापत झाल्याचा दावा त्यानी केला. त्यामुळे सामना लांबला. नायबसोबत घडलेल्या या घटनेचा आता ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ॲडम झम्पा आणि इंग्लंडचा दिग्गज खेळाडू मायकेल वॉन यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

ॲडम झम्पा संतापला

अफगाणिस्तान-बांगलादेश सामन्यात घडलेल्या या घटनेचा समाचार घेत ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर गोलंदाज ॲडम झम्पाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये संताप व्यक्त केला आहे. झम्पाने गुलबदिन नायबच्या ‘फेक इंज्युरी’चा खरपूस समाचार घेत इंग्रजीत ‘रेनस्ट्रिंग’ हा शब्द वापरला आहे. झम्पाच्या संतापाचे कारण असे की, अफगाणिस्तानच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. जर अफगाणिस्तान हारला असता तर ऑस्ट्रेलिया सेमीफायनलला गेली असती.

मायकेल वॉननेही घेतला खरपूस समाचार

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन आपल्या धारदार वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो आणि यावेळीही त्याने असेच काही केले आहे. त्याने म्हटले की, दुखापत झाल्यानंतर २५ मिनिटांत विकेट घेणारा गुलबदिन इतिहासातील पहिला क्रिकेटपटू बनला हे पाहून आनंद झाला.

उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा सामना कोणाशी होणार?

आता T20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच अफगाणिस्तानचा संघ आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. हा उपांत्य सामना 27 जून रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरु होईल. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि इंग्लंड आमने-सामने असतील. हा सामना संध्याकाळी होईल.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.