AUSW vs INDW, 3rd T20: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघामध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. पहिला सामना अनिर्णीत सुटल्यानंतर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. त्यानंतर आता अखेरचा टी20 सामना पार पडणार आहे.
मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. याठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामने, एक कसोटी सामना आणि तीन टी20 सामने खेळवले जाणार होते. आधी एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 ने ऑस्ट्रलेयाने जिंकली. ज्यानंतर एकमेव कसोटी सामना ड्रॉ झाल. ज्यानंतर सध्या टी20 मालिका सुरु आहे. यातील पहिली टी20 पावसामुळे अनिर्णीत सुटली. तर दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्सनी विजय मिळवला. ज्यानंतर आता अखेरची टी20 मॅच पार पडणार आहे.
टी20 मालिकेत पहिला सामना अनिर्णीत सुटला असला तरी दुसरा सामना मात्र चुरशीचा झाला. सामन्यात भारतीय फलंदाजानी प्रथम फलंदाजी केली. पण कर्णधार हरमणप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर यांनी केवळ काही काळ झुंज दिली. पुजाने शेवटच्या काही षटकांत 27 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या. ज्यामुळे भारत किमान 118 धावा करु शकला. त्याआधी कर्णधार कौरने 28 धावा केल्या होत्या. इतर सर्व फलंदाज अयशस्वी झाले. त्यानंतर 119 धावांचे लक्ष्य पूर्ण करताना ऑस्ट्रेलियाकी सुरुवात चांगली नव्हती. दुसऱ्या चेंडूवरच एलिसा हीली बाद झाली. ज्यानंतर मेग लेनिंग (4) आणि बेथ मूनी (34) यांनी डाव सांभाळला. पण गायकवाडने दोघांना बाद केलं. पण अखेर ताहलिया मॅक्गाने नाबाद 42 धावा करत संघाला 5 चेंडू आणि 4 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. त्यामुळे आता मालिकेचा रिजल्ट तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यावर अवंलबून आहे.
सामना कुठे खेळविला जाणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील तिसरा टी20 सामना रविवारी, 10 ऑक्टोबर रोजी कॅरारा ओव्हल या क्वीन्सलँड येथीली मैदानावर खेळवला जाईल.
सामन्याला कधी सुरुवात होणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातीलतिसरा टी20 सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजून 40 मिनीटांनी सुरु होईल.
सामना कुठे पाहणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील एकमेव कसोटी सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर थेट प्रसारित होईल.
लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे?
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील या सामन्याचं Live Streaming SonyLiv वर असेल.
अशी होती एकदिवसीय सामन्यांची मालिका
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका झाली. भारताने ही मालिका 2-1 च्या फरकाने गमावली खरी पण सर्वच भारतीय महिलांनी उत्तम खेळीचे दर्शन यावेळी घडवलें. पहिला सामना 9 विकेट्सने गमावल्यावर दुसऱ्या सामन्यातही भारतीय महिलांना 5 विकेट्सने पराभव पत्कारावा लागला. पण अखेरच्या सामन्यात 2 विकेट्सने भारताने विजय मिळवला. हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियन संघाचा सलग 26 एकदिवसीय सामने जिंकण्याचा विजयी रथही भारताने थांबवला.
हे ही वाचा
AUSW vs INDW, 2nd T20: भारतीय फलंदाजानी ऑस्ट्रेलियासमोर गुडघे टेकले, 4 विकेट्सने गमावला सामना
IPL 2021: तगडी मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाण्यात अयशस्वी, अपयशामागे संघातीलच पाच खेळाडू कारण
T20 World Cup 2021 स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका, धडाकेबाज फलंदाज संघाबाेहर
(AUSW vs INDW, 3rd T20 live Streaming When And Where To watch online to free in marathi)