कोच द्रविड खास डायरी नेहमी सोबत का ठेवतो? आवेश खानकडून राहुलच्या डायरीतले सिक्रेट्स शेअर
भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या हातात अनेकदा एक डायरी पाहायला मिळते. द्रविडच्या या डायरीत काय आहे? असा प्रश्न अनेकांना आतापर्यंत पडला आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या हातात अनेकदा एक डायरी पाहायला मिळते. द्रविडच्या या डायरीत काय आहे? असा प्रश्न अनेकांना आतापर्यंत पडला आहे. प्रत्येक सामन्यादरम्यान, सराव सत्रांदरम्यान त्याच्या हातात ही डायरी दिसते. राहुलच्या या डायरीत नेमकं काय असतं? याबाबत भारतीय संघातील एका नवोदित खेळाडूने माहिती शेअर केली आहे. हा खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग नाही. पण त्याने टी-20 मालिकेत राहुल द्रविडसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली आहे. या खेळाडूने राहुलची डायरी पाहिली आहे, त्यात काय लिहिलं आहे, ते वाचलं आहे. (Avesh khan exposed secret of Rahul Dravid’s diary)
राहुल द्रविडच्या डायरीचे रहस्य उघड करणाऱ्या या 24 वर्षीय भारतीय खेळाडूचे नाव आवेश खान आहे, ज्याने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत राहुल द्रविडची डायरी डीकोड केली आहे. आवेश खानने सांगितले की, राहुल द्रविड सामन्यातील प्रत्येक खेळाडूच्या चुका त्याच्या डायरीत लिहितो. कोणत्या खेळाडूने काय चूक केली. एखाद्या खेळाडूने चांगले काम केले असेल, या गोष्टींची नोंद तो त्याच्या डायरीत ठेवत असतो. यानंतर टीम मीटिंगमध्ये तो त्या सर्व गोष्टी सांगतो. प्रत्येक खेळाडूला एक-एक करून त्याच्या चुका सांगतो, त्याने काही चांगलं केलं असेल तर त्याचं कौतुक करतो. कोणत्या दुरुस्त्या करायला हव्यात, कुठे सुधारणे आवश्यक आहे, याबद्दल राहुल खेळाडूंना मार्गदर्शन करतो.
How does Rahul Dravid like to deal with mistakes? ?
Keep up with all things #TeamIndia as Avesh Khan reveals the answer on #FollowTheBlues.
Every Sunday, 9 AM | Star Sports Network pic.twitter.com/JczHgaoxuo
— Star Sports (@StarSportsIndia) November 22, 2021
चुकांमधून शिकणे गरजेचे : द्रविड
आवेश खानच्या म्हणण्यानुसार, राहुल द्रविड म्हणतो की, प्रत्येकजण चुका करतो. पण त्या चुका सुधारल्या पाहिजेत. पुढच्या सामन्यात त्या चुकीची पुनरावृत्ती होता कामा नये. जर तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकलात तर तुम्ही एक चांगले क्रिकेटपटू व्हाल. राहुल द्रविडने कोचिंगची पहिली परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याच्या कोचिंगमध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत विजय मिळवला. भारताने किवी संघाला व्हाईटवॉश दिला आहे. आता न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका ही राहुल द्रविडची दुसरी मोठी कसोटी आहे.
इतर बातम्या
IND vs NZ: कसोटी मालिकेपूर्वी कोच राहुल द्रविडची रणनीती तयार, ओपनरला मिडल ऑर्डर फलंदाज बनवलं
भारताने दोनदा हातातली ICC Trophy गमावली; माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींची खंत
(Avesh khan exposed secret of Rahul Dravid’s diary)