टीम इंडियाने बाहेर केलं, त्याच गोलंदाजाने घातला धुमाकूळ, प्रतिस्पर्धी टीम 59 रन्सवर Allout

क्रुणाल पंड्या, अंबाती रायडू सारखे प्लेयर असलेल्या टीमची लावली वाट

टीम इंडियाने बाहेर केलं, त्याच गोलंदाजाने घातला धुमाकूळ, प्रतिस्पर्धी टीम 59 रन्सवर Allout
Team india
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 7:01 PM

पुणे: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत फलंदाजांनंतर आता गोलंदाजांची चमक पहायला मिळाली आहे. आज डी.वाय.पाटील स्टेडियमवर सामना झाला. या मॅचमध्ये आवेश खानने भेदक गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीमुळे बडोदासारख्या मजबूत संघाचा डाव 59 धावात आटोपला. अंबाती रायडू, क्रुणाल पंड्यासारखे खेळाडू बडोदा टीममधून खेळतात.

बडोद्याच काहीच चाललं नाही

आवेश खानच्या पेससमोर आज त्यांच काहीच चाललं नाही. मध्य प्रदेशच्या टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 349 धावा केल्या. प्रत्युत्तरात बडोद्याचा डाव फक्त 17.1 ओव्हरमध्ये आटोपला. आवेश खानने क्रुणाल पंड्या, विष्णू सोलंकी सारख्या फलंदाजांना बाद केलं. त्याने ओपनर आदित्य वाघमोडचा सुद्धा विकेट काढला. बडोद्याचा पहिला विकेट चौथ्या ओव्हरमध्ये गेला. त्यावेळी टीमच्या 13 धावा झाल्या होत्या.

त्यानंतर बडोद्याची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. बडोद्याचा निम्मा संघ फक्त 34 रन्सवर तंबूत परतला. त्यानंतर 59 धावातच बडोद्याची टीम ऑलआऊट झाली.

टीम बाहेर होताच दाखवली चमक

आवेश खानला टीम इंडियात स्थान मिळालेलं नाही. तो टी 20 वर्ल्ड कप स्क्वाडचा भाग नव्हता. त्याला जितकी संधी मिळाली, त्यात तो विशेष काही करु शकला नाही. त्याचा फिटनेसही 100 टक्के नव्हता. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीचा वेग कमी झाला होता. पण आता हा खेळाडू पूर्णपणे फिट आहे. त्याने आपल्या गोलंदाजीची दाहकता दाखवून दिलीय.

आवेश खानच सर्वोत्तम प्रदर्शन

आवेश खानने लिस्ट ए क्रिकेटमध्ये आपलं सर्वोत्तम प्रदर्शन केलय. मध्य प्रदेशच्या या गोलंदाजाने पहिल्यांदाच पाच विकेट घेतल्या. याआधी त्याची सर्वोत्तम कामगिरी 62 धावा देऊन 3 विकेट होती.

बडोद्याच्या एकाही फलंदाजाने दोन आकडी धावा नाही केल्या

बडोद्याचा एकही फलंदाज आज दोन आकडी धावा करु शकला नाही. कॅप्टन रायडू आणि वाघमोडेने 9-9 रन्स केल्या. तेच मध्य प्रदेशच्या टीमने याच मैदानावर 349 धावा फटकावल्या. त्यांच्या 4 फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.