टीम इंडियात पुन्हा ‘शुभमंगल सावधान’, KL Rahul नंतर आणखी एक क्रिकेटपटू विवाहबद्ध
हॅरिस रौफ, शादाब खान या पाकिस्तानी क्रिकेटर्सनी काही दिवसापूर्वीच लग्न केलं. टीम इंडियाचा दुसरा स्टार केएल राहुल 23 जानेवारीला विवाहबद्ध झाला. त्याने अभिनेत्री आथिया शेट्टी सोबत लग्न केलं.
अहमदाबाद – क्रिकेट विश्वात सध्या लग्नाचा सीजन सुरु आहे. भारत आणि पाकिस्तानचे स्टार क्रिकेटपटू आपल्या जोडीदारासोबत विवाहबद्ध होत आहेत. हॅरिस रौफ, शादाब खान या पाकिस्तानी क्रिकेटर्सनी काही दिवसापूर्वीच लग्न केलं. टीम इंडियाचा दुसरा स्टार केएल राहुल 23 जानेवारीला विवाहबद्ध झाला. त्याने अभिनेत्री आथिया शेट्टी सोबत लग्न केलं. आता टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेलने सुद्धा आयुष्यात नव्या इनिंगला सुरुवात केलीय. भारतीय ऑलराऊंडर अक्षर पटेलच 26 जानेवारीला गुजरातच्या वडोदरामध्ये लग्न झालं. अक्षर पटेलने गर्लफ्रेंड मेहा पटेलसोबत लग्न केलं.
वऱ्हाडी मंडळींचा जोरदार डान्स
वडोदऱ्याच्या कबीर फार्मवर गुरुवारी संध्याकाळी अक्षर पटेलच्या लग्नाची वरात निघाली होती. यात वऱ्हाडी मंडळींनी जोरदार डान्स केला. फटाके फोडले. अक्षरच्या लग्नाला आलेल्या सर्वांनीच धमाल केली. अक्षर पटेलने स्टायलिश अंदाजात वरातीमध्ये एंट्री केली. एका विंटेज कारमध्ये बसून तो लग्नमंडपात पोहोचला.
लग्नाच्या आधी विकत घेतली ‘ही’ आलिशान कार
अक्षरची पत्नी मेहा पेशाने डायटिशियन आणि न्यूट्रीशनिस्ट आहे. अक्षर पटेल आणि मेहा मागच्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी 2022 मध्ये अक्षरच्या वाढदिवशी साखरपुडा केला. आता एकवर्षानंतर ते विवाहबद्ध झालेत. दोघांनी लग्नाच्या काहीदिवस आधीच एक नवी मर्सिडीज बेंज क्लास कार विकत घेतली. ते फोटो मेहाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. टीम इंडियातून लग्नाला कोण होतं?
लग्नासाठी म्हणून अक्षरला न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे आणि टी 20 सीरीजमधून विश्रांती देण्यात आलीय. गुरुवारी जवळचा मित्र परिवार आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत तो पवित्र विवाहबंधनात अडकला. अक्षरच्या लग्नाला क्रिकेट विश्वातून कोण उपस्थित होतं? ते अजून समजलेलं नाही. सध्या अक्षर पटेल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रवींद्र जाडेजाचा पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातय.