PAK vs ENG: चिडलेल्या पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींनी Babar Azam बद्दल वापरले अत्यंत खालच्या पातळीचे शब्द, VIDEO

PAK vs ENG: स्टेडियममध्ये बाबर आजमबद्दल नको त्या शब्दांचा वापर, तू कसला....VIDEO

PAK vs ENG: चिडलेल्या पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींनी Babar Azam बद्दल वापरले अत्यंत खालच्या पातळीचे शब्द, VIDEO
Babar Azam Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Dec 12, 2022 | 11:54 AM

लाहोर: बाबर आजम पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली टीम आयसीसी टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली होती. सध्या पाकिस्तानी टीम इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. दुसरा कसोटी सामना मुल्तान येथे सुरु आहे. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या इनिंग दरम्यान पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींनी बाबर आजमला खूप सुनावलं. प्रेक्षकांनी कसला किंग? म्हणून बाबरची हेटाळणी केली.

भरपूर टोमणे मारले

बाबर आजमची तुलना विराट कोहली बरोबर होते. कोहलीला किंग कोहली म्हटलं जातं. त्यामुळे बाबरला सुद्धा पाकिस्तानात किंग बाबर म्हटलं जातं. इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या कसोटीत दुसऱ्या इनिंगमध्ये बाबर ज्या पद्धतीने आऊट झाला, त्यावरुन त्याला भरपूर टोमणे मारण्यात आले.

तू कसला किंग?

बाबर आजमला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिनसनने आऊट केलं. लंचनंतर पाकिस्तानने मोहम्मद रिजवानचा विकेट गमावला. त्यानंतर रॉबिनसनने बाबरची विकेट काढली. रॉबिनसनने ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकलेला चेंडू बाबरने सोडला. पण चेंडू आत आला व ऑफ स्टम्पवर आदळला. बाबर बोल्ड झाला.

झिमबाबर म्हणून हिणवत होते

बाबरने 10 चेंडूंचा सामना करुन एक रन्स काढला. बाबर आजम पॅव्हेलियनमध्ये परतत असताना, पाकिस्तानी फॅन्सनी त्याला टोमणे मारले. प्रेक्षक त्याला झिमबाबर म्हणून हिणवत होते. झिमबाबरचा अर्थ, जो फलंदाज फक्त झिम्बाब्वे विरुद्ध खेळतो. एका फॅनने तर, तू कुठला किंग? या शब्दात आपला राग व्यक्त केला.

पहिल्या डावात चांगली फलंदाजी

बाबर आजम दुसऱ्या इनिंगमध्ये अपयशी ठरला. पण पहिल्य़ा इनिंगमध्ये त्याने चांगली बॅटिंग केली होती. पहिल्या इनिंगमध्ये त्याने अर्धशतक झळकावलं होतं. त्याच्या इनिंगच्या बळावरच पाकिस्तानला आपली लाज वाचवता आली होती. बाबरने पहिल्या इनिंगमध्ये 95 चेंडूंचा सामना केला. त्याने 10 चौकार आणि एका षटकारच्या मदतीने 75 धावा केल्या. बाबरने याआधी रावळपिंडी येथील पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात शतक झळकावलं होतं. 136 धावा केल्या होत्या.

महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....