IND vs PAK: ‘बाबर ही वेळ निघून जाईल’, पाकिस्तानच्या पराभवानंतर खिल्ली उडवणारे भन्नाट मीम्स व्हायरल

IND vs PAK: सोशल मीडियावर ट्रोलर्सनी बाबर आजमची अक्षरक्ष: वाट लावली आहे. बाबर आजमने विराट कोहली बद्दल एक टि्वट केलं होतं. त्याच टि्वटची नेटीझन्सनी बाबर आजमला आठवण करुन दिली आहे.

IND vs PAK: 'बाबर ही वेळ निघून जाईल', पाकिस्तानच्या पराभवानंतर खिल्ली उडवणारे भन्नाट मीम्स व्हायरल
Ind vs pak social MediaImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 8:07 AM

मुंबई: भारताने आशिया कप 2022 (Asia cup) स्पर्धेची शानदार सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर (IND vs PAK) दिमाखदार विजय मिळवला. भारताच्या या विजयी कामगिरीनंतर पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजमवर (Babar Azam) चहू बाजूंनी टीका होतेय. सोशल मीडियावर ट्रोलर्सनी बाबर आजमची अक्षरक्ष: वाट लावली आहे. बाबर आजमने विराट कोहली बद्दल एक टि्वट केलं होतं. त्याच टि्वटची नेटीझन्सनी बाबर आजमला आठवण करुन दिली आहे. बाबर आजमने मागच्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये साखळी सामन्यात भारताविरुद्ध दमदार खेळ दाखवला होता. त्याच्याच बळावर पाकिस्तानने भारताविरुद्ध एकतर्फी विजय मिळवलेला. पण कालच्या सामन्यात बाबर आजमच काही चाललं नाही. जागतिक टी 20 क्रिकेट मधील हा नंबर 1 फलंदाज भारतासमोर फ्लॉप ठरला. त्याला विशेष चमक दाखवता आली नाही.

अचूक व्यूहरचना आखली

भारताचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमारने अचूक व्युहरचना आखून त्याला जाळ्यात अडकवलं. बाबर आजमने 9 चेंडूत फक्त 10 धावा केल्या. भुवनेश्वरच्या बाऊन्सवर बाबर फसला. त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण अर्शदीपने सोपा झेल घेतला.

पाकिस्तानी संघ सावरलाच नाही

त्या धक्क्यातून पाकिस्तानचा संघ शेवटपर्यंत सावरलाच नाही. पाकिस्तानची संपूर्ण टीम 147 धावांवर ऑलआऊट झाली. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताने अखेरच्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केलं.

पाकिस्तानला पराभव पचवता येत नाही

भारताकडून झालेला पराभव पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींना सहजासहजी पचवता येत नाही. सोशल मीडियावर त्याचे पडसाद दिसून येत आहेत. बाबर आजम ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. काही महिन्यांपूर्वी बाबर आजमने विराट कोहलीच्या समर्थनार्थ एक टि्वट केलं होतं. ही वेळ निघून जाईल, तू मजबूत रहा, नेटीझन्सनी बाबरला त्याच टि्वटची आठवण करुन दिली आहे. बाबर मजबूत रहा, ही वेळ निघून जाईल, असं एका टि्वटर युजरने म्हटलं आहे. बाबर आजमवर भन्नाट पोट धरुन हसवणारे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.