‘बाबर आजम फक्त आपल्या…’ पाकिस्तानी कॅप्टनवर मोठा आरोप
आशिया कप 2022 च्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर पाकिस्तानी टीमवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतय.
मुंबई: आशिया कप 2022 च्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर पाकिस्तानी टीमवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतय. पाकिस्तानचा माजी कॅप्टन सलमान बट्टने बाबर आजमच्या टीमवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलय. एकत्र खेळूनही पाकिस्तानी टीम पुढे जाऊ शकत नाही. त्यांच्यात सुधारणेची शक्यता फारच कमी आहे, अशा शब्दात सलमान बटने पाकिस्तानी टीमवर निशाणा साधला.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांच्यावरही सलमान बटने प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. फक्त मैत्रीमुळे पाकिस्तानी टीममध्ये असलेल्या खेळाडूंबद्दलही शोएब मलिकने बोललं पाहिजे, असं बाबर आजम म्हणाला.
फक्त युवा खेळाडूंमुळे जिंकू शकत नाही
टीममध्ये युवा खेळाडू हवेत. पण अनुभवी खेळाडू सुद्धा हवेत. त्यांच योग्य मिश्रण आवश्यक आहे. हे युवा खेळाडू असेच परिपक्व होणार नाहीत. त्यांच्याजवळ अनुभवी खेळाडू सुद्धा हवेत.
सगळेच एकसारखे खेळाडू
तुम्ही सगळेच एकसारखे खेळाडू जमवले आहेत. त्यामुळे सुधारणेची शक्यता कमी आहेत. आपल्यापेक्षा जास्त चांगल्या व्यक्तींमध्ये आपला वावर वाढतो, तेव्हाच आपल्यात सुधारणा होते असं बट म्हणाला.
शोएब मलिकने मोकळेपणाने बोलावं
शोएब मलिकने पाकिस्तानी टीममधील यारी-दोस्तीबद्दलही मोकळेपणाने बोलावे, असा सलमान बट्टने सल्ला दिला. पाकिस्तानी टीममध्ये यारी-दोस्ती निभावली जातेय, असं शोएब मलिक म्हणाला होता. मलिकने सांगावं की, तो कोणाबद्दल बोलतोय.
काय होतं ते टि्वट
आशिया कपमधील पराभवानंतर शोएब मलिकने टि्वट केलं होतं. “आपण केव्हा मैत्री आणि आवडीचा-नावडीचा या संस्कृतीमधून बाहेर येणार आहोत”