IPL सारख्या प्रसिद्ध लीग स्पर्धेत Babar Azam, मोहम्मद रिजवानला कुणीही भाव दिला नाही

सुपरफास्ट क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या या दोन दिग्गजांवर कोणालाही विश्वास उरलेला नाही, असंच दिसतय. कारण शाहीन शाह आफ्रिदीला मोठ्या किंमतील विकत घेतलं, मग बाबर आजम, मोहम्मद रिजवानला का नाही?

IPL सारख्या प्रसिद्ध लीग स्पर्धेत Babar Azam, मोहम्मद रिजवानला कुणीही भाव दिला नाही
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 10:32 AM

लंडन : IPL इतकीच इंग्लंडमध्ये होणारी ‘द हंड्रेड’ टुर्नामेंट लोकप्रिय आहे. दोन यशस्वी सीजननंतर ‘द हंड्रेड’ स्पर्धेचा तिसरा सीजन येणार आहे. 1 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या लीगसाठी नुकतच ऑक्शन पार पडलं. आठ टीम्सनी ड्राफ्टमधील खेळाडूंवर पैसा लावून त्यांना विकत घेतलं. ते तिसऱ्या सीजनसाठी या टीम्सकडून खेळणार आहेत. या ऑक्शनमध्ये अनेक मोठ्या खेळाडूंना भाव मिळाला नाही. हे खेळाडू अनसोल्ड ठरले.

धक्कादायक बाब म्हणजे आठ टीम्सपैकी कोणीही पाकिस्तानी कॅप्टन बाबर आजम आणि स्टार बॅट्समन मोहम्मद रिजवान यांच्यावर बोली लावली नाही. त्याशिवाय वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन कायरन पोलार्ड आणि आंद्र रसेलला सुद्धा खरेदीदार मिळाला नाही.

PSL मध्ये बाबर-रिजवानने किती धावा केल्या?

बाबर आजमवर कुठल्याच टीमने बोली लावली नाही, याचं अनेकांना आश्चर्य वाटतय. टी 20 फॉर्मेटमध्ये बाबर आजमचा रेकॉर्ड कमालीचा आहे. अलीकडेच पाकिस्तानात झालेल्या सुपर लीगमध्ये त्याने चांगल्या धावा केल्या होत्या. त्याने 11 मॅचमध्ये 522 रन्स केले. तेच रिजवानने 12 सामन्यात 550 धावा फटकावल्या. त्याची सरासरी 50 पेक्षा पुढे होती.

का दोघांना खरेदी केलं नाही? बाबर आजम आणि मोहम्मद रिजवानला न खरेदी करण्यामागे उपलब्धता कारण असल्याच सांगितलं जातय. ऑगस्ट महिन्यात पाकिस्तान अफगाणिस्तान विरुद्ध सीरीज खेळणार आहे. हे दोन्ही खेळाडू पूर्ण सीजन खेळणार नाहीत, यावर अनेक टीम्सना विश्वास बसत नाहीय. मग शाहीन शाह आफ्रिदीला का विकत घेतलं?

बाबर आणि रिजवान उपलब्ध नसल्याच कारण दिलं जातय. तेच ‘द हंड्रेड’ मध्ये शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ, एहसानुल्लाह खेळणार आहेत. शाहीनला वेल्श फायरने 1 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलय. मग बाबर आणि रिजवानला का विकत घेतलं नाही? हा प्रश्न आहे. दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.