भारतीय क्रिकेटविश्वावर शोककळा, फिल्डिंग दरम्यान क्रिकेटरचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन
भारतीय क्रिकेट विश्वावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. कारण गेल्या १० दिवसात तिसऱ्या खेळाडूचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटवर ( Indian Cricket ) पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. कारण 10 दिवसात तिसऱ्या भारतीय क्रिकेटरचा मृत्यू ( Cricketer Dies on Field ) झालाय. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. 34 वर्षीय भारतीय क्रिकेटपटूचं हृदयविकाराच्या धक्क्याने ( Heart Attack ) निधन झाले आहे. गेल्या 10 दिवसांत गुजरातमधील तिसऱ्या क्रिकेटपटूने हृदयविकाराच्या झटक्याने जगाचा निरोप घेतला. शनिवारी सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना एसजीएसटी विभागाचे वसंत राठोड यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.
एसजीएसटी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राठोडचा संघ सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करत होता. जेव्हा तो मैदानावर आला तेव्हा तो पूर्णपणे फिट दिसत होता. राठोड बॉलिंग क्रीजजवळ उभा होता.
सामन्यादरम्यान छातीत वेदना
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, क्षेत्ररक्षण करत असताना राठोडला अचानक छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या आणि काही सेकंदातच तो खाली पडला. सुरुवातीला छातीत तीव्र वेदना होत असल्याने तो काही वेळ बसून राहिला. पण नंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. सहकारी खेळाडूंनीही त्याला हाताळण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात आधी त्याला डेंटल कॉलेजमध्ये नेण्यात आलं, जिथे मॅच सुरू होती. यानंतर त्यांना सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
10 दिवसात 3 क्रिकेटर्सचा मृत्यू
आठवडाभरापूर्वी अशा दोन घटना घडल्या होत्या. राजकोट येथील प्रशांत भरोलिया (27) आणि सुरत येथील जिग्नेश चौहान (31) यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सामना खेळल्यानंतर दोघांनाही छातीत दुखू लागल्याने उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.
( राज्यातील आणि जगभरातील ताज्या बातम्या मराठीत ( Marathi News ) वाचण्यासाठी Tv9 Marathi च्या वेबसाईटला फॉलो करत राहा. महत्त्वाच्या बातम्या ( Latest Marathi news ) सर्वात आधी तुम्हाला पाहण्यासाठी आमच्या TV9 marathi Live या Youtube चॅनेलला फॉलो करा. )