Ashes, ENG vs AUS: अरे देवा! बॉल स्टम्पला लागला, अंपायरने LBW दिला, तरीही बॅट्समन नॉट आऊट

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उपाहारानंतर एक विचित्र घटना घडली. डावाच्या 30 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर बेन स्टोक्सने चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला. चेंडू पॅडला लागल्याचा विचार करून ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अपील केले. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे अपील ऐकून अंपायर पॉल रायफल यांनीही बोट वर केले.

Ashes, ENG vs AUS: अरे देवा! बॉल स्टम्पला लागला, अंपायरने LBW दिला, तरीही बॅट्समन नॉट आऊट
Ben Stokes
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 1:27 PM

ENG vs AUS : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. मालिकेतील पहिले तीन सामने गमावलेल्या इंग्लंड संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. यासोबतच हा सामना जिंकून इंग्लंडला मालिकेत व्हाईट वॉश देण्याचा प्रयत्न कांगारु करतील. (Ball hits stumps, But bells did not fall, umpire gives LBW out; Strange incident in Ashes, Ben Stokes)

दरम्यान, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उपाहारानंतर एक विचित्र घटना घडली. डावाच्या 30 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर बेन स्टोक्सने चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला. चेंडू पॅडला लागल्याचा विचार करून ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अपील केले. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे अपील ऐकून अंपायर पॉल रायफल यांनीही बोट वर केले.

या निर्णयाविरोधात बेन स्टोक्सने लगेचच डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये जे दिसले ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. चेंडू बॅट किंवा पॅडला लागला नव्हता. खरे तर चेंडू स्टंम्पला लागला होता. मात्र बेल्स खाली पडल्या नाहीत, त्यामुळे स्टोक्स थोडक्यात बचावला.

ही खूप विचित्र गोष्ट होती : वॉर्न

शेन वॉर्नने फॉक्स क्रिकेटसाठी समालोचन करताना सांगितले की, मी अशी घटना कधीच पाहिली नव्हती. वॉर्न म्हणाला, अंपायरने काय म्हणून आऊट दिलं होतं? किती विचित्र गोष्ट होती ती. पॉल रायफल हा गोलंदाज होता आणि त्याने चेंडू स्टंपला लागताना पाहिला आणि म्हणाला, ‘यू आर आउट.’

वॉर्न म्हणाला, ही खूप विचित्र गोष्ट आहे, अशी घटना मी पहिल्यांदाच पाहिली, ज्यात मी पंचाना फलंदाजाला बाद घोषित करताना पाहिलं. कारण या घटनेत चेंडू स्टम्पला लागला मात्र बेल्स पडल्या नाहीत. मला माफ करा, मी अजूनही शॉकमध्ये आहे. मला अजूनही खात्री नाही की आम्ही नेमकं काय पाहिलंय.’

आपण गोलंदाजांच्या प्रति निष्पक्ष असलं पाहिजे : तेंडुलकर

या घटनेबद्दल सचिन तेंडुलकर म्हणाला, ‘बॉल स्टम्पला लागल्यानंतरही बेल्स पडल्या नाहीत, यासाठी ‘हिटिंग द स्टंप्स’ हा नियम करायला हवा. तुम्हाला काय वाटते? गोलंदाजांच्या प्रति आपण निष्पक्ष असले पाहिजे.

सामना ऑस्ट्रेलियाच्या नियंत्रणात

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाने पहिला डाव आठ बाद 416 धावा करून घोषित केला होता. संघात पुनरागमन करणाऱ्या उस्मान ख्वाजाने नाबाद 137 धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथने 67 धावांची खेळी खेळली. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने पाच विकेट घेत शानदार कामगिरी केली.

प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत इंग्लंडने पहिल्या डावात 4 बाद 135 धावा केल्या होत्या. बेन स्टोक्स 52 आणि जॉनी बेअरस्टो 45 धावा करून खेळत आहेत. चहापानापर्यंत दोघांमध्ये 99 धावांची भागीदारी झाली. चहापानानंतर स्टोक्स 66 धावा करून बाद झाला. त्याला ऑफस्पिनर नॅथन लायनने एलबीडब्ल्यू आऊट केले.

इतर बातम्या

IND vs SA : तिसऱ्या कसोटीत विराट कोहली खेळणार का? कोच राहुल द्रविड म्हणाला…

IND vs SA : द. आफ्रिकेतील पहिल्या कसोटी मालिकाविजयासाठी भारताला केपटाऊनचा इतिहास बदलणे गरजेचे!

IND vs SA : जोहान्सबर्गमधला पराभव जिव्हारी, टीम इंडियाचा WTC च्या फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर

(Ball hits stumps, But bells did not fall, umpire gives LBW out; Strange incident in Ashes, Ben Stokes)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.