T20 World Cup मधील कामगिरीचा बांग्लादेश संघाला फटका, पाकिस्तानविरुद्ध सामन्यांसाठी संघात मोठे बदल, 13 वर्षानंतर दिग्गज संघाबाहेर
एकीकडे न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येत असून त्याच दरम्यान पाकिस्तानचा संघ बांग्लादेशच्या दौऱ्यावर जात आहे. दोन्ही ठिकाणी 3 टी20 सामने आणि 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
कराची: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) चांगल्या प्रदर्शनानंतरही पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्याने चॅम्पियन होण्याचं त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. दरम्यान आता पाकिस्तानचा संघ बांग्लादेशच्या दौऱ्यावर (Pakistan vs Bangladesh) जाणार आहे. यावेळी 2 कसोटी सामने आणि 3 टी20 सामने खेळवले जाणार असून पाकिस्ताननंतर आता बांग्लादेशनेही त्यांचा संघ जाहीर केला आहे. यावेळी संघात काही मोठे बदल पाहायला मिळाले.
विश्वचषकातील खराब प्रदर्शनामुळे बांग्लादेशने संघात काही बदल केले असून टीममधून 4 खेळाडूंना बाहेर बसवण्यात आले आहे. यात सर्वात मोठा बदल म्हणजे दिग्गज फलंदाज मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) याला 2008 नंतर पहिल्यांदाच संघाबाहेर बसवण्यात आलं आहे. तसंच गोलंदाज रुबेल हुसैन (Rubel Hossain) हाही संघात नाही आहे. तर दिग्गज खेळाडू शाकिब अल हसन आणि सैफुद्दीन दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत.
बांग्लादेश: मेहमुदुल्लाह (कर्णधार), नूरुल हसन (यष्टीरक्षक), शमीम होसैन, मोहम्मद नईम, नसुम अहमद, अमीनुल इस्लाम, सैफ हसन, मेहदी हसन, शहीदुल इस्लाम, नजमुल हसन शंटो, मुस्तफिजुर रहमान, यासिर अली, अफीफ हुसैन, तास्किन अहमद, अकबर अली आणि शोरीफुल इस्लाम.
असं आहे वेळापत्रक
पहिला सामना, 19 नोव्हेंबर, ढाका.
दुसरा सामना, 20नोव्हेंबर, ढाका.
इतर बातम्या
T20 WC : डेव्हिड वॉर्नरने कर्णधाराचा शब्द राखला, फिंचने केलेली भविष्यवाणी खरी ठरवली
भारतीय संघाचं प्रशिक्षक पद सोडताच रवी शास्त्रींकडे नवी कामगिरी, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत
(Bangladesh drop 4 players including mushfiqur rahim for match against pakistan)