T20 World Cup: जबरदस्त! SIX रोखण्यासाठी त्याने प्राणाची पर्वा नाही केली, पहा VIDEO
त्याला श्वासही नीट घेता येत नव्हता. अशी फिल्डिंग क्वचित पहायला मिळते.
ब्रिस्बेन: टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये आतापर्यंत मैदानावर सरस फिल्डिंग पहायला मिळाली आहे. ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर सोमवारी जबरदस्त फिल्डिंगच दृश्य दिसलं. आयर्लंडचा खेळाडू बॅरी मॅकार्थीची फिल्डिंग पाहून सर्वचजण थक्क झाले. मॅकार्थीने बाऊंड्री लाइनवर कमालीची डाइव्ह मारुन सिक्स रोखला. त्याचा प्रयत्न इतका जबरदस्त होता की, स्टेडियममध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक उभे राहून त्याच्यासाठी टाळ्या वाजवत होते.
फिल्डिंगला तोड नाही
15 व्या ओव्हरमध्ये एडेयरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या स्टॉयनिसने हवेत शॉट मारला. चेंडू हवेत खूप उंच गेला. ऑस्ट्रेलियाला षटकार मिळेल, असं सर्वांना वाटलं. पण लाँग ऑफवर उभ्या असलेल्या मॅकार्थीने डाइव्ह मारुन चेंडू पकडला. बाऊंड्री लाइनच्या आत पडण्याआधी त्याने चेंडू बाहेर फेकला. मॅकार्थीच्या या फिल्डिंगमुळे ऑस्ट्रेलियाला 6 ऐवजी फक्त 1 रन्स मिळाला.
मॅकार्थीला दुखापत
जबरदस्त फिल्डिंग त्याने केली. पण यात त्याला दुखापत झाली. मॅकार्थी कमरेवर पडला. त्याला भरपूर वेदना होत होत्या. त्यानंतर लगेच आयरिश फीजियो त्याच्याजवळ पोहोचला. मॅकार्थीला श्वास घेताना अडचण येत होती.
View this post on Instagram
गोलंदाजीत दाखवला जलवा
मॅकार्थीने गोलंदाजी देखील तितकीच चांगली केली. त्याने 4 ओव्हरमध्ये 29 धावा देऊन 3 विकेट काढल्या. मॅकार्थीने डेविड वॉर्नर, मिचेल मार्श आणि एरॉन फिंच या टॉप फलंदाजांची विकेट काढली. ऑस्ट्रेलियाने पहिली बॅटिंग करताना 5 विकेट गमावून 179 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन एरॉन फिंचने सर्वाधिक 63 धावा केल्या आहेत.