VIDEO: हा चेंडू पाहून तुम्ही वॉर्न-मुरलीधरनला विसराल, म्हणाल, हे कसं शक्य आहे? फलंदाजही चक्रावला
क्रिकेटच्या मैदानात (Cricket Ground) अनेकदा एकापेक्षा एक सरस चेंडू पहायला मिळतात. खासकरुन स्पिनर्सनी (Spinners) आपल्या वळणाऱ्या चेंडूंनी फलंदाजांना धक्का दिलाय.
मुंबई: क्रिकेटच्या मैदानात (Cricket Ground) अनेकदा एकापेक्षा एक सरस चेंडू पहायला मिळतात. खासकरुन स्पिनर्सनी (Spinners) आपल्या वळणाऱ्या चेंडूंनी फलंदाजांना धक्का दिलाय. चेंडूच्या टर्न बद्दल बोलायच झाल्यास, तुमच्या डोक्यात पहिली दोन नाव येतील, ती म्हणजे शेन वॉर्न (Shane Warne) आणि मुथय्या मुरलीधरन. या दोघांच्या फिरकी गोलंदाजीसमोर भल्या-भल्या फलंदाजांनी गुडघे टेकले होते. शेन वॉर्नच्या एका चेंडूला, तर बॉल ऑफ द सेंच्युरी म्हटलं गेलं. पण आता एक असाच सर्वांना थक्क करुन सोडणारा चेंडू पहायला मिळालाय. ज्या फलंदाजाने या चेंडूचा सामना केला, नक्कीच त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील.
क्लब सामन्यात चक्रावून टाकणारी गोलंदाजी
इंग्लंड मध्ये क्लब सामन्यात एक फलंदाज अशा पद्धतीने आऊट झाला की, पाहणारे सगळेच जण हैराण झाले. खुद्द गोलंदाजालाही स्वत:च्या चेंडूवर विश्वास बसला नाही. फलंदाज असा कसा आऊट झाला?. मध्यमगतीने गोलंदाजी करणाऱ्या एका गोलंदाजाने लेग स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला. तो आधी वाईड चेंडू वाटला. पण चेंडू 90 डिग्री मध्ये टर्न झाला आणि मीडिल स्टम्प उडाला. आता प्रश्न हा आहे की, हा चेंडू इतका वळला कसा?. खरंतर गोलंदाजाने जिथे चेंडू टाकला, तिथे थोडासा खड्डा पडला होता. चेंडू तिथे पडून टर्न झाला. फलंदाज क्लीन बोल्ड झाला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय.
OH NO!! Tag a mate this would happen too.. ??? #r66tacademy @TheBarmyArmy pic.twitter.com/HpPHeME7ad
— The Root Academy (@TheRootAcademy) August 8, 2022
इंग्लंड क्लब क्रिकेट सामन्यातील एक विचित्र घटना
इंग्लंड मध्ये क्लब क्रिकेट सामन्यात अनेकदा उलट-सुलट घटना घडत असतात. असे व्हिडिओ फॅन्सना खूप आवडतात. मोठ्या प्रमाणात शेयर केले जातात. क्रिकेटच्या मैदानात कॉमेडी सीन्स क्रिएट होतात, ज्याचा विचार केलेला नसतो.