BBL 2022-23: टी 20 मध्ये पहिल्यांदा असं घडलं, संपूर्ण टीम 15 रन्सवर All Out

BBL 2022-23: ऑस्ट्रेलियात प्रतिष्ठेच्या बिग बॅश लीगमध्ये हे घडलय.

BBL 2022-23: टी 20 मध्ये पहिल्यांदा असं घडलं, संपूर्ण टीम 15 रन्सवर All Out
big bash leagueImage Credit source: GETTY IMAGES
Follow us
| Updated on: Dec 16, 2022 | 7:37 PM

सिडनी: क्रिकेटच्या खेळात अनेकदा एखाद्या टीमचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतो. पण बिग बॅश लीगमध्ये तर हद्दच झाली. बिग बॅश लीगमध्ये शुक्रवारी एडिलेड स्ट्रायकर्सने सिडनी थंडरच्या टीमला फक्त 15 रन्समध्ये ऑलआऊट केलं. सिडनी थंडरची टीम फक्त 35 चेंडूत ऑलआऊट झाली. सिडनीच्या टीममध्ये एलेक्स हेल्स, रिली रुसोसारखे मोठे खेळाडू होते. पण तरीही टीमने सरेंडर केलं. बिग बॅश लीगच्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी 2015 मध्ये मेलबर्न रेनीगेड्सची टीम 57 रन्सवर ऑलआऊट झाली होती.

इतका लाजिरवाणा रेकॉर्ड टर्की टीमच्या नावावर होता

पुरुष क्रिकेटमध्ये पहिल्यांदा कुठला संघ 20 रन्सपेक्षा पण कमी धावसंख्येत ऑलआऊट झालाय. सिडनी थंडरची 15 ही धावसंख्या टी 20 क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी टर्कीच्या नावावर एका नको त्या रेकॉर्डची नोंद होती. 2019 मध्ये चेक रिपब्लिक विरुद्ध टर्कीची टीम फक्त 21 रन्सवर ऑलआऊट झाली होती. आता हा रेकॉर्ड सिडनी थंडरच्या नावावर झालाय. चेंडूच्या हिशोबाने सुद्धा सिडनी थंडर्सने हा लाजिरवाणा रेकॉर्ड बनवलाय. पुरुष क्रिकेटमध्ये पहिल्यांदा कुठल्या संघाचा डाव इतक्या कमी धावांमध्ये आटोपलाय.

सिडनी थंडरकडून ब्लंडर

सिडनी थंडरला फक्त 140 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण त्यांच्या फलंदाजांनी खराब क्रिकेट खेळण्यात कुठलीही कसर ठेवली नाही. ओपनर एलेक्स हेल्स., मॅथ्यू गिल्क्स खातही उघडू शकले नाहीत. रिली रुसोने खात उघडलं. पण तो 3 रन्सवर आऊट झाला. कॅप्टन जेसन संघा सुद्धा शुन्यावर बाद झााल. एलेक्स रॉस, डेनियल सॅम्स क्रीजवर आले व पॅव्हेलियनमध्ये परतले.

सिडनी थंडरची लाजिरवाणी फलंदाजी

सिडनी थंडरचे 4 बॅट्समन खातही उघडू शकले नाहीत.

सिडनी थंडरचा एकही फलंदाज दोन आकडी धावा गाठू शकला नाही.

सिडनी थंडरकडून सर्वाधिक स्कोर 4 धावा होता. 10 व्या क्रमांकाच्या पलंदाजाने या रन्स केल्या.

सिडनी थंडरचा कुठलाही फलंदाज 6 पेक्षा जास्त चेंडू खेळू शकला नाही.

सिडनी थंडर के 15 में से 3 रन एक्स्ट्रा से बने.

सिडनी थंडरच्या 15 पैकी 3 धावा एक्स्ट्रामधून आल्या.

एडिलेड स्ट्रायकर्सच्या गोलंदाजाचा कहर

एकाबाजूला सिडनी थंडरच्या बॅट्समननी खराब फलंदाजी केली. दुसऱ्याबाजूला एडिलेड स्ट्रायकर्सच्या गोलंदाजांनी करिष्माई प्रदर्शन केलं. मॅथ्यू शॉर्टने पहिला विकेट काढला. मात्र त्यानंतर हेनरी थॉन्टर्न आणि वेस एगरने सिडनीची वाट लावली. थॉर्न्टनने 2.5 ओव्हर्समध्ये फक्त 3 रन्स देऊन 5 विकेट काढल्या. एगरने 6 धावा देऊन 4 विकेट काढल्या.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.