चौथ्या कसोटीत विजयानंतरही विराट आणि शास्त्रींवर BCCI नाराज, नेमकं प्रकरण काय?
चौथ्या कसोटी सामन्यात भारताने ओव्हलच्या मैदानावर 50 वर्षानंतर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल सर्व भारतीय खेळाडूंच कौतुक होत आहे. पण बीसीसीआय कर्णधार विराट आणि प्रशिक्षक रवी यांच्यावर नाराज आहे.
लंडन : भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket team) ओव्हलच्या कसोटीत (Oval Test) इंग्लंडला मात देत विजय मिळवला. या विजयासह मालिकेतही भारताने आघाडी घेतली आहे. पण या अप्रतिम कामगिरीनंतर देखील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यावर नाराज आहे. या दोघांच्या एका कृतीमुळे बीसीसीआय नाराज आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोहली आणि शास्त्री यांनी लंडनमधील काही सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावल्यामुळे बीसीसीआय त्यांच्यावर नाराज आहे. कारण अशाच एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला मागील मंगळवारी रवी शास्त्री गेले असता त्यानंतर काही दिवसांत त्याची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे.
रवी शास्त्री काही सहकाऱ्यांसोबत मिळून इंग्लंडमध्ये एका हॉटेलात पुस्तक प्रकाशन सोहळ्याला गेले होते. त्या सोहळ्यानंतर 5 दिवसांनी रविवारी शास्त्री यांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कात बॉलिंग कोच भरत अरूण, फील्डिंग कोच आर. श्रीधर हे आले असून त्यांचाही कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे.सध्या हे सर्वजण विलगीकरणात आहेत.
BCCI कडून चौकशी सुरु
रवी शास्त्री आणि विराट कोहली यांना संबधित कार्यक्रमात जाण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. पण एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले, ”बीसीसीआयला संबधित कार्यक्रमाचे काही फोटो मिळाले आहेत. त्यानुसार सर्व तपास सुरु असून या सर्वाबद्दल बीसीसीआय शास्त्री आणि कोहली यांच्याशी बोलणार आहे.” इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी (ECB) देखील बीसीसीआय संपर्कात असून अशी कोणतीही घटना परत घडणार नाही यासाठी दोन्ही बोर्ड लक्ष ठेवून आहेत.
इतर बातम्या
Special Report : इंग्लंड दौऱ्यातही मोठी खेळी नाहीच, अजिंक्य रहाणेचं करिअर संपलं का?
(BCCI Angry Over Virat Kohli and Ravi Shastri for Attending Crowded events)