IPL 2022 च्या Final बद्दल BCCI चा मोठा निर्णय, Play-off चा सहा दिवसांचा कार्यक्रम, जाणून घ्या पूर्ण शेड्यूल
IPL Play off: आता जाणून घ्या, कुठले सामने कधी आणि कुठल्या मैदानावर होतील. IPL 2022 चा प्लेऑफचा क्वालिफायरचा पहिला सामना 24 मे रोजी कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर होईल.
मुंबई: BCCI ने IPL 2022 प्लेऑफ सामन्यांच्या तारखांची घोषणा केली आहे. तारखांबरोबर हे सामने कुठे होणार? ती ठिकाणं सुद्धा बीसीसीआयने जाहीर केली आहेत. 15 व्या सीजनचे प्लेऑफचे सामने कधी? आणि कुठे होणार?, तो सर्व कार्यक्रम बीसीसीआयने शनिवारी जाहीर केला. बीसीसीआयच्या एपेक्स काउन्सिलच्या मीटिंगमध्ये प्लेऑफ (Play off) आणि फायनल सामन्यांच्या वेन्यूबद्दल निर्णय घेण्यात आला. BCCI ने प्लेऑफचा सहा दिवसांचा कार्यक्रम बनवला आहे. कोलकाता ते अहमदाबाद दरम्यान चार सामने खेळले जातील. या सहा दिवसानंतर आयपीएलमधील नवीन चॅम्पियन संघ सर्वांसमोर येईल. IPL 2022 चे प्लेऑफचे सामने फक्त दोन शहरात खेळवले जाणार आहेत. कोलकता आणि अहमदाबाद ही ती दोन शहर आहेत. कोलकातामध्ये क्वालिफायरचा पहिला आणि एलिमिनेटरचा सामना खेळवला जाईल. अहमदाबादमध्ये क्वालिफायरचा दुसरा आणि फायनल मॅच होईल.
कोलकातामध्ये पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटरचा सामना
आता जाणून घ्या, कुठले सामने कधी आणि कुठल्या मैदानावर होतील. IPL 2022 चा प्लेऑफचा क्वालिफायरचा पहिला सामना 24 मे रोजी कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर होईल. हा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये पोहोचेल. 26 मे रोजी एलिमिनेटरचा सामना होईल. कोलकात्याच्या इडन गार्डन्सवरच हा सामना होईल. या मॅचनमध्ये पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. जिंकणाऱ्या टीमला दुसरा क्वालिफायरचा सामना खेळण्याची संधी मिळेल.
Update from Apex Council Meeting:
The first #IPL2022 play-off and eliminator in Kolkata on May 24 and 26 followed by second play-off and final at Ahmedabad on May 27 and 29 respectively will be held to full capacity.
— Subhayan Chakraborty (@CricSubhayan) April 23, 2022
अहमदाबादमध्ये IPL 2022 ची फायनल
दुसऱ्या क्वालिफायरमध्ये एलिमिनिटेरची मॅच जिंकणाऱ्या टीमचा सामना पहिल्या क्वालिफायरमध्ये हरलेल्या टीम बरोबर होईल. IPL 2022 चा दुसरा क्वालिफायर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 27 मे रोजी खेळला जाईल. हा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये पोहोचेल. IPL 2022 ची फायनल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 29 मे रोजी खेळली जाईल.