IPL 2021 साठी नियमांमध्ये बदल, बीसीसीआयकडून नवी नियमावली जाहीर

IPL New Rules : कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे मागील वर्षी मध्येच थांबवण्यात आलेली आय़पीएल आता पुन्हा सुरु करण्यात येत आहे. भारताऐवजी युएईत होणाऱ्या या स्पर्धेसाठी नवी नियमावलीही बीसीसीआयने जाहीर केली आहे.

IPL 2021 साठी नियमांमध्ये बदल, बीसीसीआयकडून नवी नियमावली जाहीर
आयपीएल 2021
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 11:03 AM

मुंबई : आयपीएल 2021 (IPL 2021) कोरोनाच्या शिरकाव झाल्याने मध्येच थांबवण्यात आली. आता उर्वरीत स्पर्धा युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धे संबधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक नियमावली जाहीर केली आहे. स्पर्धेदरम्यान बीसीसीआयने खेळाडूंची सुरक्षा आणि कोरोना नियमांना समोर ठेवून ही नियमावली तयार केली आहे. यातील एक महत्त्वाचा नियम म्हणजे फलंदाजाने चेंडू षटकार, चौकार मारुन स्टँडमध्ये किंवा मैदानाबाहेर पाठवला. तर तो चेंडू बदलला जाईल. तसेच बाहेर गेलेल्या चेंडूला संपूर्णपणे सॅनिटाईज करुन ठेवले जाईल.

इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने बीसीसीआयच्या नियमावलीनंतर दिलेल्या माहितीनुसार ,“जर चेंडू स्टँडमध्ये किंवा  स्टेडियम बाहेर जातो. तर चौथा पंच त्याच्याकडी चेंडूंशी तो चेंडू बदलून नवा चेंडू खेळण्यासाठी देईल. तसेच बाहेरुन आलेला चेंडू सॅनिटायज करुन त्याच्याकडील चेंडूमध्ये ठेवला जाईल.”

बीसीसीआयकडून संपूर्ण सतर्कता

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, चेंडूंवर रिसर्च केल्यानंतर त्यातून कोरोना व्हायरसचे संक्रमण होण्याची शक्यता खूप कमी आहे. तरी देखील कोणतीही जोखीम बीसीसीआय घेणार नसल्याने हा सॅनिटायजेशनचा पर्याय बीसीसीआय वापरत आहे. मागील वर्षी काही खेळाडू कोरोनाबाधित झाल्याने स्पर्धा मध्येच थांबवली होती. त्यामुळे यंदा अशी कोणतीच जोखीम बीसीसीआयला घ्यायची नाही. स्पर्धेसाठी प्रेक्षकांना बोलवण्याबाबत बीसीसीआय विचार करत असून प्रेक्षक आले तरी त्यांना कडक नियम पाळावे लागणार आहेत

सहा दिवसांच कडक विलगीकरण

आयपीएलसाठी युएईत येणाऱ्या खेळांडूसह सपोर्ट स्टाफ अशा सर्वांना सहा दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. तसेच बायो बबलमध्ये येण्यापूर्वी त्यांच्या तीन कोरोना चाचण्या होणे आणि त्या तीनही निगेटिव्ह येणे अनिवार्य आहे. इंग्लंडमधील भारतीय खेळाडूंना विलगीकरणाचे नियम पाळावे लागणार नसले तरी त्यांना बायो बबलचे नियम मात्र पाळावे लागणार आहेत.

उर्वरीत आयपीएल 2021 चे संपूर्ण वेळापत्रक

19 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 20 सप्टेंबर – कोलकाता नाइट रायडर्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी 21 सप्टेंबर – पंजाब किंग्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 22 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 23 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी 24 सप्टेंबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शाहजाह 25 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स VS राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी 25 सप्टेंबर – सनयारझर्स हैदराबाद VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शाहजाह 26 सप्टेंबर – चेन्नई सुपर किंग्स VS कोलकाता नाईट रायडर्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी 26 सप्टेंबर – पंजाब किंग्स VS मुंबई इंडियन्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 27 सप्टेंबर- सनरायझर्स हैदराबाद VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 28 सप्टेंबर – कोलकाता नाइट रायडर्स VS दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह 28 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी 29 सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 30 सप्टेंबर – सनरायझर्स हैदराबाद VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह 1 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 2 ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स VS दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह 2 ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी 3 ऑक्टोबर – पंजाब किंग्स VS रॉयल चँलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह 3 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 4 ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 5 ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह 6 ऑक्टोबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी 7 ऑक्टोबर – चेन्नई सुपर किंग्स VS पंजाब किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – दुबई 7 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह 8 ऑक्टोबर – सनरायझर्स हैदराबाद VS मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी 8 ऑक्टोबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 10 ऑक्टोबर – क्वालिफायर, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 11 ऑक्टोबर – एलिमिनेटर, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह 13 ऑक्टोबर – क्वालिफायर 2, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह 15 ऑक्टोबर- अंतिम सामना, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई

इतर बातम्या

IPL 2021: यूएईत 19 सप्टेंबरपासून घमासान, पहिल्या सामन्यात मुंबई VS चेन्नई भिडणार, पाहा संपूर्ण टाईमटेबल एका क्लिकवर

(BCCI announced circular of new rules for IPL 2021 held in UAE)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.