बीसीसीआयने जाहीर केले देशांतर्गत क्रिकेटचे वेळापत्रक, 27 ऑक्टोबरपासून सय्यद मुश्ताक अली करंडकाने सुरुवात होणार
विजय हजारे करंडक (राष्ट्रीय एकदिवसीय) 1 ते 29 डिसेंबर दरम्यान खेळली जाईल, तर वरिष्ठ महिला संघ आपली पहिली स्पर्धा - राष्ट्रीय एकदिवसीय - 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान खेळेल. हंगामाची सुरुवात 20 सप्टेंबर रोजी महिला आणि पुरुषांच्या अंडर -19 एकदिवसीय (विणू मांकड) सह होईल.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) देशांतर्गत क्रिकेटसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये रणजी करंडक स्पर्धेचा 2021-22 चे सत्र 5 जानेवारी ते 20 मार्च दरम्यान खेळले जाईल. कोविड -19 च्या साथीमुळे गेल्या हंगामात रणजी ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले नव्हते कारण 38 संघांसाठी बायो बबल तयार करण्यात ‘लॉजिस्टिक’ अडथळ्यांना सामोरे जावे लागले असते. बीसीसीआयच्या देशांतर्गत कॅलेंडरच्या या सत्रात रणजी ट्रॉफी खेळली जाईल. पण वरिष्ठ पुरुष क्रिकेटची सुरुवात 27 ऑक्टोबरपासून सय्यद मुश्ताक अली करंडकाने होईल, जी सर्वोत्तम क्रिकेटपटूंची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी इंडियन प्रीमियर लीग नंतर आयोजित केली जाईल. (BCCI announces schedule for domestic cricket, The season will start with the Syed Mushtaq Ali Trophy)
जानेवारी ते मार्च दरम्यान रणजी करंडक आयोजित करणे म्हणजे आयपीएलच्या आधी ही स्पर्धा पूर्ण होईल. आयपीएल सहसा मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या सुरुवातीला सुरू होते. 2022 पासून, बीसीसीआयची तयारी 10 संघांच्या आयपीएलसाठी आहे. अशा परिस्थितीत भारताच्या आणखी खेळाडूंना आयपीएल खेळण्याची संधी मिळेल. कोरोनामुळे देशांतर्गत क्रिकेट रद्द झाल्याने निराश झालेल्या खेळाडूंसाठी ही चांगली बातमी आहे. गेल्या हंगामात रणजी ट्रॉफीच्या अनुपस्थितीमुळे देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या उत्पन्नावर वाईट परिणाम झाला आहे.
विजय हजारे करंडक डिसेंबरमध्ये होणार
विजय हजारे करंडक (राष्ट्रीय एकदिवसीय) 1 ते 29 डिसेंबर दरम्यान खेळली जाईल, तर वरिष्ठ महिला संघ आपली पहिली स्पर्धा – राष्ट्रीय एकदिवसीय – 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान खेळेल. हंगामाची सुरुवात 20 सप्टेंबर रोजी महिला आणि पुरुषांच्या अंडर -19 एकदिवसीय (विणू मांकड) सह होईल. यानंतर अनुक्रमे 25 आणि 26 ऑक्टोबर रोजी पुरुष आणि महिला दोघांसाठी अंडर -19 चॅलेंजर ट्रॉफी होईल. अंडर -25 (राज्य अ) एकदिवसीय सामना 9 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान सुरू होईल, तर सीके नायडू ट्रॉफी (गेल्या वर्षीच्या अंडर -23 ऐवजी आता अंडर -25) 6 जानेवारीपासून सुरू होईल.
गट
वरिष्ठ पुरुष स्पर्धेसाठी (रणजी करंडक, विजय हजारे करंडक आणि सय्यद मुश्ताक अली करंडक), 38 संघांना सहा गटांमध्ये विभागले जाईल. प्रत्येकी सहा संघांचे पाच एलिट गट आणि आठ संघांचा एक प्लेट गट असेल. (BCCI announces schedule for domestic cricket, The season will start with the Syed Mushtaq Ali Trophy)
नाशिक मार्केट परिसरातील इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला भीषण आग, लाखोंचा मुद्देमाल जळून खाक#Nashik #Fire #NashikFirehttps://t.co/klQ6cP9aGz
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 19, 2021
इतर बातम्या