3 महिन्यात 3 संघांसोबत भिडणार टीम इंडिया, वर्ल्डकप आधी भारताची कसोटी
भारतीय संघ पुढील तीन महिने व्यस्त राहणार आहे. कारण भारतीय संघाला तीन संघासोबत सीरीज खेळायच्या आहेत. ज्याचं वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केलंय.
मुंबई : टीम इंडिया (Team India) सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यात वनडे आणि टेस्ट सीरीज खेळली जात आहे. वनडे सीरीज गमवल्यानंतर आता टेस्ट सीरीज तरी टीम इंडिया जिंकणार का याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष लागून आहे. भारतीय चाहत्यांना पुढील 3 महिने क्रिकेटची मनसोक्त आनंद लुटता येणार आहे. कारण भारतीय संघ नॉन स्टॉप सामने खेळणार आहे.(BCCI announces schedule for home series against Sri Lanka, New Zealand and Australia)
बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाच्या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ज्यामध्ये भारतीय संघ तीन देशांच्या संघासोबत भिडणार आहे. भारतीय संघ श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघासोबत सामने खेळणार आहे. हे तीन संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. जानेवारीत न्यूझीलंड आणि श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघासोबत सामने खेळणार आहे.
श्रीलंका संघा विरुद्ध 3 टी20 सामने आणि 3 वनडे सामन्यांची सीरीज खेळली जाणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध ही टीम इंडिया 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे. तर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील 4 टेस्ट सामने भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका सीरीज (India vs Sri Lanka)
पहिला टी20 सामना – 3 जानेवारी (मुंबई) दुसरी टी20 सामना – 5 जानेवारी (पुणे) तिसरा टी20 सामना – 7 जानेवारी (राजकोट)
पहिला वनडे सामना – 10 जानेवारी (गुवाहाटी) दुसरा वनडे सामना – 12 जानेवारी (कोलकाता) तिसरा वनडे सामना – 15 जानेवारी (तिरुवनंतपुरम)
भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरीज (India vs New Zealand)
पहिला वनडे सामना – 18 जानेवारी (हैदराबाद) दूसरा वनडे सामना – 21 जानेवारी (रायपूर) तीसरा वनडे सामना – 24 जानेवारी (इंदोर) पहिला टी20 सामना – 27 जानेवारी (रांची) दुसरा टी20 सामना – 29 जानेवारी (लखनऊ) तिसरा टी20 सामना – 1 फेब्रुवारी (अहमदाबाद)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सीरीज (India vs Australia)
पहिला टेस्ट सामना – 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी (नागपूर) दुसरा टेस्ट सामना – 17 ते 21 फेब्रुवारी (दिल्ली) तिसरा टेस्ट सामना – 1 ते 5 मार्च (धर्मशाला) चौथा टेस्ट सामना – 9 ते 13 मार्च (अहमदाबाद) पहिला वनडे सामना – 17 मार्च (मुंबई) दुसरा वनडे सामना – 19 मार्च (विशाखापट्टणम) तिसरा वनडे सामना – 22 मार्च (चेन्नई)
तीन संघाविरुद्ध सीरीज खेळल्यानंतर टीम इंडियाला वर्ल्डकपची (World cup 2023) तयारी देखील करायची आहे. दुसरीकडे मार्च एप्रिलमध्ये आयपीएल (IPL) होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना अनेक रोमहर्षक सामने पाहायला मिळणार आहेत.