BCCI Annual Awards 2023 Live Telecast | बीसीसीआय पुरस्कार सोहळा कुठे पाहता येणार?
Bcci Annual Awards Live Streaming | बीसीसीआय 2019 नंतर पहिल्यांदाच 4 वर्षांनी पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. हा कार्यक्रम कुठे पाहता येईल? जाणून घ्या.
मुंबई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 25 जानेवारीपासून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्याआधी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ पुरस्कार सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन 4 वर्षांनंतर होत आहे. बीसीसीआयने याआधी वार्षिक सोहळा 2018-2019 चं आयोजन हे मुंबईत कोरोनाआधी करण्यात आलं होतं. तेव्हा 13 जानेवारी 2020 रोजी हा कार्यक्रम पार पडला होता.
तेव्हा जसप्रीत बुमराह याला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून ‘पॉली उमरीगर पुरस्काराने’ गौरवण्यात आलं होतं. तर पूनम यादव हीने वूमन्स क्रिकेटमधून पुरस्कार जिंकला होता. आता यंदा होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात इंग्लंड क्रिकेट टीमचे खेळाडू सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा पुरस्कार सोहळा कुठे पाहता येणार, हे आपण जाणून घेऊयात.
बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा कधी?
बीसीसीाआयचा पुरस्कार सोहळा 23 जानेवारी रोजी होणार आहे.
बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा कुठे?
बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा हा हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
बीसीसीआयचा पुरस्कार सोहळ्याला किती वाजता सुरुवात होणार?
बीसीसीआयचा पुरस्कार सोहळ्याला संध्याकाळी 6 वाजेपासून सुरुवात होणार आहे.
बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा कुठे पाहता येणार?
बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा जिओ सिनेमा एपवर फुकटात पाहता येईल.
रवी शास्त्री यांचा विशेष सन्मान
Ravi Shastri to receive BCCI’s lifetime achievement award tomorrow. [Express Sports]
– Winners of the last 4 years will be given their awards. pic.twitter.com/7o4Zax76RQ
— Johns. (@CricCrazyJohns) January 22, 2024
टेस्ट सीरिजसाठी इंग्लंड क्रिकेट टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टली, जॅक लीच, ऑली पोप, डॅन लॉरेन्स, रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
पहिल्या 2 कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.