Team India: ‘ही’ प्रसिद्ध कंपनी टीम इंडियाची साथ सोडणार, BCCI च्या महत्त्वाच्या बैठकीत होणार निर्णय
Team India: 'ही' प्रसिद्ध कंपनी कर्मचारी कपातीच्या विचारात आहे. ही कंपनी टीम इंडियाची साथ का सोडणार?
मुंबई: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या शीर्ष परिषदेची सोमवारी बैठक होणार आहे. या बैठकीत टीम इंडियाची जर्सी स्पॉन्सर कंपनी बायजूस सोबतच्या करारावर चर्चा होईल. या बैठकीत स्टारच्या मीडिया राइट्सबद्दलही चर्चा होईल. ही बैठक व्हर्च्युल असेल. अलीकडेच टीम इंडियाच्या किट निर्माता कंपनीत बदल झालाय. एमपीएलऐवजी किलर कंपनीसोबत करार झालाय. आता आणखी एक बदलाची शक्यता दिसतेय.
बोर्डाने बायजूसला काय सांगितलेलं?
बायजूस कंपनीला बीसीसीआयसोबतचा आपला करार संपवायचा आहे. मागच्या महिन्यात झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली होती. बैठकीत बोर्डाने कंपनीला मार्च 2023 पर्यंत करार कायम ठेवायला सांगितलं होतं.
कंपनीला कर्मचारी कपात करायची आहे?
बायजूसने अलीकडेच कर्मचारी कपात करायची आहे, असं सांगितलं होतं. 50,000 कर्मचाऱ्यांपैकी पाच टक्के कर्मचारी कपात करायची आहे, असं कंपनीने सांगितलं होतं. मागच्यावर्षी जूनमध्ये बायजूसने बीसीसीआयसोबतचा जर्सी स्पॉन्सरशिपचा करार वाढवला. नोव्हेंबर 2023 पर्यंत हा करार वाढवण्यात आला.
फिफा वर्ल्ड कपमध्ये स्पॉन्सरशिप
बायजूसने 2019 साली ओप्पो या मोबाइल निर्माता कंपनीची जागा घेतली. तेव्हापासून टीम इंडियाच्या जर्सीवर बायजूसचा नाव दिसतय. बायजूसने फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये स्पॉन्सरशिप दिली होती. स्टारच्या मीडिया राइट्सवर होणार चर्चा
बायजूससोबत स्टार मीडिया राइट्सच्या विषयावर चर्चा होईल. स्टारकडे सध्या देशांतर्गत प्रसारणाचे मीडिया राइट्स आहेत. मार्चनंतर हे राइट्स रिन्यू करावे लागणार आहेत. मागच्यावर्षी बीसीसीआयने आयपीएल टीव्ही मीडिया राइट्सची 48,390 कोटींना विक्री केली होती. बीसीसीआयने 2023 ते 2027 साठी हे राइट्स दिले. बीसीसीआयच्या लिलावात स्टारला टीव्ही राइट्स विकत घेण्यात यश मिळालं होतं. बीसीसीआयला मीडिया राइट्स, जर्सी राइट्स आणि अन्य राइट्सच्या विक्रीतून भरपूर पैसा मिळतो. त्याच बळावर बीसीसीआय क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत बोर्ड आहे.