BCCI ची नवी निवड समिती जाहीर, वर्ल्डकपमध्ये हॅटट्रिक घेणाऱ्या चेतन शर्मांची अध्यक्षपदी निवड
भारतीय क्रिकेट संघाचे माजी गोलंदाज चेतन शर्मा यांची बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे (BCCI appoints Chetan Sharma new chairman of selection committee).
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी गोलंदाज चेतन शर्मा यांची भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. चेतन शर्मा लवकरच विद्यमान अध्यक्ष सुनील जोशी यांच्याकडून पदभार स्वीकारतील. चेतन शर्मा यांच्यासह माजी गोलंदाज अभय कुरुविल्ला आणि देबाशीष मोहंती यांची देखील पाच सदस्यीय समितीत निवड करण्यात आली आहे (BCCI appoints Chetan Sharma new chairman of selection committee).
बीसीसीआयने आज (24 डिसेंबर) तीन सदस्यांच्या निवडीसाठी मुलाखती घेतल्या. या मुलाखतीनंतर तिघांची नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे अध्यक्षपदासाठी माजी गोलंदाज अजित आगरकर यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, त्यांची निवड होऊ शकली नाही.
निवड समितीच्या तीन जागांसाठी 13 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये अजित आगरकर, शिवसुंदर दास, नयन मोंगिया आणि मणिंदर सिंग यांच्यासारख्या प्रसिद्ध माजी क्रिकेटपटूंचा समावेश होता. या सर्वांच्या मुलाखतीनंतर चेतन शर्मा, अभय कुरुविल्ला आणि देबाशीष मोहंती यांची निवड करण्यात आली (BCCI appoints Chetan Sharma new chairman of selection committee).
BCCI’s Cricket Advisory Committee recommends Chetan Sharma, Abey Kuruvilla and Debashish Mohanty as the new members to the senior men’s selection committee panel pic.twitter.com/sSe2xWMzG8
— ANI (@ANI) December 24, 2020
चेतन शर्मा यांनी 23 कसोटी सामने तर 65 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी कसोटी सामन्यांमध्ये एकूण 61 तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 67 विकेट घेतल्या आहेत.
चेतन शर्मा यांनी 1984 साली पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला. त्यावेळी भारत विरुद्ध पाकिस्तान असा कसोटी सामना खेळला जात होता. विशेष म्हणजे त्यांनी पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूत पाकिस्तानचा फलंदाज मोहसिन खान याची विकेट घेतली. आयुष्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्याच षटकात विकेट घेणारे चेतन हे तिसरे गोलंदाज ठरले होते.