बांग्लादेश दौऱ्याआधी BCCI ने बोलावली इमर्जन्सी मीटिंग, ‘या’ दोन व्यक्तींना हजर राहण्याचं फर्मान
अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर 'या' बैठकीत चर्चा होईल
मुंबई: बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडिया 1 डिसेंबरला रवाना होणार आहे. पण त्याआधी BCCI ने इमर्जन्सी बैठक बोलावली आहे. या स्पेशल मीटिंगसाठी टीमचा कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांना हजर रहाण्यास सांगितलं आहे. बीसीसीआयची ही बैठक मुंबईत होणार आहे. त्याशिवाय सिलेक्श कमिटीचे काही सदस्य सुद्धा या बैठकीला हजर राहतील.
T20 वर्ल्ड कपमधील भारतीय खेळाडूंच्या प्रदर्शनाची समीक्षा करणं हा या बैठकीचा उद्देश आहे. त्याशिवाय दुसऱ्याही काही मुद्यांवर चर्चा होईल.
या प्रश्नांवर उत्तर शोधणार
टीम इंडियाचा पुढचा मार्ग कसा असेल? ते या बैठकीत ठरवलं जाईल. भारतीय टीममध्ये स्पिलिट कॅप्टन्सी हवी का? स्पिलिट कोचिंगची आवश्यका आहे का? या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा या बैठकीत प्रयत्न होईल.
काय बदलांची गरज, ते त्या दोघांना माहित आहे
“एक मीटिंग होणार. पण ती कधी होणार, हे मी सांगू शकत नाही. आम्हाला रोहित आणि राहुल दोघांनाही बांग्लादेश दौऱ्यावर जाण्याआधी भेटायच आहे. अनेक गोष्टींवर त्यांच्याशी बोलायच आहे. यात रिव्यू करण्यासारखं काही नसेल. आम्ही पुढच्या वर्ल्ड कपचा विचार करतोय. काय बदलांची आवश्यकता आहे, ते रोहित आणि राहुल या दोघांना चांगलं माहित आहे. स्पिल्ट कॅप्टनसी आणि कोचच्या विषयावर आमची भेट झाल्यानंतर आम्ही विचार करु” असं BCCI च्या सिनियर पदाधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्ला सांगितलं.
बैठकीला कोण हजर असेल?
सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या मीटिंगमध्ये कॅप्टन रोहित शर्मा, कोच राहुल द्रविड, विराट कोहली, अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह आणि चेतन शर्मा हजर असतील.
भारताचा बांग्लादेश दौरा
भारतीय टीमचा बांग्लादेश दौरा 4 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. वनडे सीरीजने या दौऱ्याची सुरुवात होईल. दोन्ही देशांमध्ये 3 वनडे सामन्यांची सीरीज खेळली जाईल. त्यानंतर कसोटी मालिका आयोजित होईल.