रहाणे-पुजाराला BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर काढणार? ऋषभ पंत-राहुलला मिळू शकतं प्रमोशन

ए प्लस, ए, बी आणि सी. या चार कॅटेगरी अंतर्गत खेळाडूंना वर्षाला सात कोटी, पाच कोटी, तीन कोटी आणि एक कोटी रुपये दिले जातात.

रहाणे-पुजाराला BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर काढणार? ऋषभ पंत-राहुलला मिळू शकतं प्रमोशन
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 9:19 PM

मुंबई: मागच्या दोन वर्षांपासून अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar pujara) खराब फॉर्ममध्ये आहेत, तरी त्यांना टीम इंडियामध्ये वारंवार संधी मिळतेय. या दोन क्रिकेटपटुंच्या भविष्यासंबंधी आता लवकरच ठोस निर्णय होऊ शकतो. बीसीसीआयकडून लवकरच सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची (BCCI Central Contracts)घोषणा होणार आहे. यामध्ये या दोन खेळाडूंबरोबर काय होतं, ते पहाव लागेल. या दोघांशिवाय केएल राहुल आणि ऋषभ पंतवर सुद्धा नजर असेल. हे दोघे तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतायत.

पंत आणि पुजाराला ग्रुप ए प्लसच्या कॅटेगरीमध्ये ठेवणार का? बीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या चार कॅटेगऱ्या आहेत. ए प्लस, ए, बी आणि सी. या चार कॅटेगरी अंतर्गत खेळाडूंना वर्षाला सात कोटी, पाच कोटी, तीन कोटी आणि एक कोटी रुपये दिले जातात.

तीन अधिकारी, पाच निवडकर्ते आणि राष्ट्रीय मुख्य कोच रिटेनरशिपबद्दल निर्णय घेतात. बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, रोहित, कोहली आणि बुमराह हे तिघे ए प्लस कॅटेगरीमध्ये कायम असतील. पण राहुल आणि पंत तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतायत, त्यामुळे त्यांना प्रमोशन मिळत का? हे पाहाव लागेल.

पुजारा-रहाणेचं काय होणार? सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये तुमचं प्रदर्शन दिसून येतं. मागच्या सत्रात तुम्ही काय कामगिरी केली, त्यावर बरच काही अवलंबून असतं. इशांत शर्मा, हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त होते. त्यामुळे त्यांचा ग्रुप बी मध्ये समावेश करण्यात येऊ शकतो. मागच्या सत्रात ग्रुप बी मध्ये फक्त शार्दुल ठाकूरने कसोटीमध्ये प्रभावी प्रदर्शन केलं होतं. त्याचं ग्रुप ए मध्ये प्रमोशन होऊ शकतं. ग्रुप सी मध्ये मोहम्मद सिराजमध्ये खूप सुधारणा झाली आहे. शुभमन गिल, हनुमा विहारीलाही अपग्रेडची अपेक्षा असेल.

सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये कुठले खेळाडू आहेत? ग्रेड ए प्लस: विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह ग्रेड ए: आर.अश्विन, रवींद्र जाडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, ग्रेड बी: वृद्धीमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, मयंक अग्रवाल, ग्रेड सी: कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज,

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.