Team India Head Coach : राहुल द्रविड यांचा उत्तराधिकारी कोण? दोन वेगवेगळे कोच असणार का?

Team India Head Coach : टीम इंडियाचा पुढचा हेड कोच कोण? याची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. टीम इंडियाच्या हेड कोचला बक्कळ पैसा मिळेल. पण ही जबाबदारी स्वीकारण कोण? हा मुख्य प्रश्न आहे. राहुल द्रविड यांचा उत्तराधिकारी शोधणं सोप नसेल. वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर राहुल द्रविड यांना मुदतवाढ देण्यात आली होती.

Team India Head Coach : राहुल द्रविड यांचा उत्तराधिकारी कोण? दोन वेगवेगळे कोच असणार का?
team india playersImage Credit source: k l rahul x account
Follow us
| Updated on: May 14, 2024 | 10:36 AM

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड बीसीसीआयने नव्या कोचचा शोध सुरु केला आहे. सध्या IPL 2024 चा सीजन सुरु आहे. त्यानंतर लगेच T20 वर्ल्ड कपला सुरुवात होईल. हा वर्ल्ड कप झाल्यानंतर टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. राहुल द्रविड यांच्याजागी हेड कोच पदावर कोणाची नियुक्ती करायची? हे बीसीसीआय समोरच मोठं आव्हान आहे. भारतीय टीमच हेड कोच बनण्यासाठी उमेदवाराला 27 मे 2024 पर्यंत अर्ज करता येईल. वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर राहुल द्रविड यांना मुदतवाढ देण्यात आली होती. राहुल द्रविड यांचं उत्तराधिकारी शोधणं बीसीसीआयसाठी सोपं नसेल. राहुल द्रविड यांच्या कोच पदाच्या कार्यकाळात अजूनही भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकून 10 पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत.

बीसीसीआयच हेडकोच पदासाठी 3.5 वर्षाचा करार करण्याला प्राधान्य आहे. पण याआधी ज्या नामांकित कोचशी बोलणं झालं ते राष्ट्रीय संघासाठी 10 महिने, वर्षभरासासाठी करार करायला सुद्धा काचकूच करत होते. सर्व फॉर्मेटमध्ये राष्ट्रीय संघाच व्यवस्थापन करताना वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल कोचेसनी चिंता व्यक्त केली. आयपीएल तसच अन्य छोट्या फॉर्मेटमध्ये पैसा उत्तम मिळतो, शिवाय भरपूर वेळ देण्याची सुद्धा गरज नसते. त्यामुळे राष्ट्रीय संघाच्या कोच पदासाठी उत्सुक असणाऱ्यांची संख्या कमी आहे. पुढच्या तीन वर्षांच टीम इंडियाच वेळापत्रक एकदम व्यस्त आहे. त्यामुळे वर्कलोड मॅनेजमेंटचा विचार करुन स्पिल्ट कोचिंग म्हणजे वेगवेगळ्या कोचचा विचार पुढे आला होता.

परदेशी कोचेस का उत्सुक्त नाहीत?

बीसीसीआयने नुकत्याच जारी केलेल्या रिलीजमध्ये आपली भूमिका एकदम स्पष्ट केली आहे. वेगवेगळ्या कोचेसचा पर्याय फेटाळून लावत सर्व फॉर्मेटसाठी एकच कोच हवा असल्याच स्पष्ट केलय. स्पिल्ट कोचिंग नसल्यामुळे परदेशी कोच फार उत्साह दाखवणार नाहीत असं दिसतय. कारण भारतात आयपीएलमध्ये परदेशी कोचेस पैसा कमावून घेतात. बीसीसीआयला शेवटी आपल्याच नावाजलेल्या खेळाडूंवर कोचिंगसाठी अवलंबून रहाव लागेल.

...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.