टीम इंडियाच्या डाएट प्लॅनमध्ये हलाल?, सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग, BCCI चा वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर बीसीसीआयला या निर्णयावरुन ट्रोल केलं आहे. बीसीसीआयवर हलाल सर्टिफाईड अन्नाचा प्रसार करण्याचा आरोप केला जातोय

टीम इंडियाच्या डाएट प्लॅनमध्ये हलाल?, सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग, BCCI चा वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
भारतीय खेळाडू
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 11:39 AM

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट टीमच्या नव्या डाएट प्लॅन वरुन वादाला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना केवळ हलाल प्रमाणित मटण खाण्यास परवानगी देण्यात आल्याची चर्चा सुरु झाली. या चर्चेनंतर सोशल मीडियावर बीसीसीआयला ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे. ट्विटवर #BCCI_Promotes_Halal या नावानं ट्रेंड सुरु करण्यात आला आहे. यामध्ये बीसीसीआयवर टीका केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी बीसीसीयआयनं टीम इंडियासाठी नवा डाएट प्लॅन जारी केला होता. त्या प्लॅनचं सक्तीनं पालन करण्याच्या सूचना खेळाडूंना देण्यात आल्याच्या चर्चा होत्या. मात्र, बीसीसीआयनं अशा कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचं म्हटलंय.

आयसीसीच्या स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन निर्णय

स्पोर्टस तक या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार खेळाडूंना कोणत्याही प्रकारे पॉर्क आणि बीफ खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. खेळाडूंचा फिटनेस आणि स्वास्थ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. खेळाडूंना मटण खायचं असल्यास त्यांनी हलाल सर्टिफाइड मटण खावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या काळातील मोठ्या मालिका आणि आयसीसीच्या स्पर्धांसाठी खेळाडूंना फिट ठेवण्याच्या उद्देशानं या नियमांचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खेळाडूंचं वजन वाढू नये, यासाठी ही पावलं उचलण्यात आली आहेत.

एका अहवालानुसार खेळाडू बायो बबलमध्ये सातत्यानं असल्यानं त्यांना अडचणी येत आहेत. क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये त्यांना एनर्जी टिकवून ठेवण्यात अडचणी निर्माण होत होती. त्यामुळं यासंबधी डाएट प्लॅन जारी करण्यात आला आहे. जे खेळाडू मटणाचे शौकिन आहेत आणि ते मटण दररोज खातात त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

बीसीसीआय सोशल मीडियावर ट्रोल

नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर बीसीसीआयला या निर्णयावरुन ट्रोल केलं आहे. बीसीसीआयवर हलाल सर्टिफाईड अन्नाचा प्रसार करण्याचा आरोप केला जातोय. भाजप आणि हिंदुत्त्वावादी संघटनांशी संबंधित ट्विवटरवरील नेटकऱ्यांनी बीसीसीआयला ट्रोल केलं आहे.

#BCCI_Promotes_Halal नावाचा ट्रेंड सुरु

आणखी एक ट्विट

हलाल मटण का खावं?

काही हिंदुत्त्ववादी संघटनांकडून हलालच्या माध्यमातून इस्लामी कायद्याला प्राथमिकता देण्यात असल्याचा आरोप केला जात आहे. हलाल पद्धतीमध्ये त्या प्राण्याला मारताना त्याचं डोक आणि श्वसननलिका कापली जाते.

इतर बातम्या:

कोच द्रविड खास डायरी नेहमी सोबत का ठेवतो? आवेश खानकडून राहुलच्या डायरीतले सिक्रेट्स शेअर

सराव सत्रादरम्यान मनी माऊची मैदानात हजेरी, विराटच्या फोटोवर अनुष्काची कमेंट, कोहलीचा भन्नाट रिप्लाय

BCCI criticized over Halal meat in Indian cricket team dietary plan social media users troll cricket control board

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.