बीसीसीआयमध्ये Sourav Ganguly एकटे पडले, जवळचा मित्र जय शाहने सुद्धा नाही दिली साथ

BCCI च्या बैठकीत जे घड़लं, ते गांगुलीसाठी सुद्धा धक्कादायक

बीसीसीआयमध्ये Sourav Ganguly एकटे पडले, जवळचा मित्र जय शाहने सुद्धा नाही दिली साथ
Sourav Ganguly, Jai Shah
Follow us
| Updated on: Oct 12, 2022 | 1:48 PM

मुंबई: टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार सौरव गांगुलीकडे BCCI च अध्यक्षपद आता फक्त नाममात्र उरलं आहे. गांगुली यांच्या जागी रॉजर बिन्नी यांची निवड निश्चित मानली जात आहे. 2019 साली सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी बीसीसीआय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता. बीसीसीआयच्या अध्यक्षपद संभाळणारे ते पहिले क्रिकेटर होते.

विश्वास जिंकता आला नाही

सौरव गांगुली यांच्या बीसीसीआयमधील इनिंगबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवले जात होते. पण तीन वर्षापेक्षा त्यांची इनिंग जास्त लांबणार नसल्याच दिसतय. सौरव गांगुली यांना बीसीसीआय पदाधिकाऱ्यांचा विश्वास जिंकता आलेला नाही.

ते एकाकी पडले

मंगळवारी बीसीसीआयची बैठक झाली. त्यात सौरव गांगुलींकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलं. ते एकाकी पडले आहेत. जवळचा मित्र जय शाह याने सुद्धा सौरव गांगुलीला साथ दिली नाही.

सौरव गांगुली यांनी सुद्धा त्यांच्यासोबत बीसीसीआयच्या बैठकीत असं काही घडेल, याची अपेक्षा केली नसेल. इनसाइड स्पोर्टने हे वृत्त दिलय. जय शाह सचिवपदी कायम राहण्याची दाट शक्यता आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची खजिनदारपदी वर्णी लागू शकते.

ते स्वत:च सर्वात शेवटी बाहेर पडले

सौरव गांगुली बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयात होता. ते स्वत:च सर्वात शेवटी बाहेर पडले. त्यांच्या बाजूला कोणीही नव्हतं बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 12 ऑक्टोबर आहे. त्याआधी उमेदवारांनी आपल्या नॉमिनेशच्या प्रक्रिया पूर्ण केल्या.

गांगुलीच्या चेहऱ्यावर निराशा दिसली

सौरव गांगुलीच आयसीसीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यात स्वप्नही संपुष्टात आलय. आयसीसीच्या चेअरमनपदासाठी सौरव गांगुलीच समर्थन करणार नाही, असं अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सूचित केलं. ‘या सगळ्या घडामोडीनंतर गांगुलीच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसत होती’ क्रिकेबजने सूत्राच्या हवाल्याने हे वृत्त दिलं.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.