IPL 2022 Mega Auction: बेबी एबीची एंट्री ते 29 कोटीचे दोन खेळाडू गायब, जाणून घ्या मेगा ऑक्शनबद्दल ‘या’ चार गोष्टी
आयपीएलच्या या महाबोलीमध्ये जगभरातील 590 क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. एकूण खेळाडुंपैकी 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडू आहेत.
मुंबई: IPL ही क्रिकेट जगतातील एक गर्भश्रीमंत लीग आहे. या लीगमध्ये टॅलेंटड युवा खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. आयपीएलचा यंदाचा 15 वा सीजन आहे. IPL 2022 Mega Auction साठी खेळाडूंची निवड झाली आहे. आयपीएलच्या या महाबोलीमध्ये जगभरातील 590 क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. एकूण खेळाडुंपैकी 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडू आहेत. लिलावात भारतानंतर ऑस्ट्रेलियाचे (Australia) सर्वाधिक 47 क्रिकेटपटू आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी 24 क्रिकेटपटू आहेत. वेस्ट इंडिजचे 34, दक्षिण आफ्रिकेचे 33 आणि श्रीलंकेचे 23 खेळाडू आहेत. अफगाणिस्तानचे 17 खेळाडू आहेत. बांगलादेश-आयर्लंडचे प्रत्येकी पाच, झिम्बाब्वेचा एक, नांबियाचे तीन, नेपाळचा एक, स्कॉटलंडचे दोन आणि अमेरिकेचा एक खेळाडू आहे. मेगा ऑक्शनबद्दल जाणून घ्या या चार महत्त्वाच्या गोष्टी
IPL 2022 मध्ये सर्वात वयोवृद्ध आणि तरुण खेळाडू कोण आहे? आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये इमरान ताहिर हा सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटू असणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा लेग स्पिनर 42 वर्षांचा आहे. अफगाणिस्तानचा नूर अहमद हा सर्वात युवा खेळाडू आहे. नूर अहमद चायनामन गोलंदाजी करतो. अंडर 19 वर्ल्डकपमध्ये त्याने सहा विकेट काढल्या आहेत.
बेबी एबीची IPL 2022 मध्ये एंट्री दक्षिण आफ्रिकेच्या अंडर 19 संघातील स्टार आणि एबी डिविलियर्ससारखी फलंदाजी करणारा डेवाल्ड ब्रेविसचीही IPL 2022 मेगा ऑक्शनसाठी निवड झाली आहे. डेवाल्डची बेस प्राइस 20 लाख रुपये आहे. ब्रेविसला आरसीबी विकत घेऊ शकते. नुकत्याच संपलेल्या अंडर 19 वर्ल्डकपमध्ये ब्रेविसने जोरदार कामगिरी केली. डेवाल्डने पाच सामन्यात 73 च्या सरासरीने 368 धावा केल्या आहेत.
ड्वेन ब्रावोने रचला इतिहास ड्वेन ब्रावो पुन्हा एकदा आयपीएल ऑक्शनमध्ये दिसणार आहे. आयपीएलच्या 15 व्या सीजनपर्यंत खेळणारा तो पहिला परदेशी खेळाडू आहे. याआधी डिविलियर्स, ख्रिस गेल आणि शॉन मार्श 2008 ते 2021 दरम्यान आयपीएलच्या प्रत्येक सीजनमध्ये खेळले आहेत. पण यावेळी हे तिन्ही खेळाडू नाहीयत.
29 कोटी मुल्य असलेले दोन खेळाडू गायब मागच्यावर्षी 15 कोटी रुपयांना विकला गेलेला काइल जेमिसन हा खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये दिसणार नाही. त्याशिवाय 14 कोटी रुपयांमध्ये विक्री झालेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनही आयपीएल 2022 मध्ये दिसणार नाही.
BCCI IPL 2022 Mega Auction Know everything about auction kyle jamieson jhye richardson़